मराठवाडा

अचानक मंत्री रुग्णांच्या लाईन मध्ये, प्रशासनाची तारांबळ

उस्मानाबाद – आरोग्यमंत्री डाँ तानाजी सावंतांच्या जिल्हयातच औषधाचा तुटवडा असल्याचा अनुभव दस्तुरखुद्द केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाँ भारती पवार यांना आलाय त्याची पडताळणी करण्यासाठी डाँ भारती पवार या जिल्हा रुग्णालयातील औषध देणाऱ्या रुग्णांच्या औषधासाठी लाईन मध्ये उभा राहुन औषध बाबत विचारणा केली.

उस्मानाबाद हा आकांक्षित जिल्हयात असल्यामुळे विविध योजणांचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डाँ भारती पवार या उस्मानाबाद दौऱ्यावर होत्या, आज जागतिक एडस दिन निमित्त असल्यामुळे आरोग्य विभागाकडुन प्रभात फेरीचे आयोजन जिल्हा रुग्णालयात केले होते त्या उद्घाटनाला जिल्हा रुग्णालयात आल्यानंतर काही रुग्ण हे औषध मिळत नाहीत बाहेरुन औषधे घ्या असे कर्मचारी सांगतात अशी तक्रार घेवुन आले. तेंव्हा डाँ भारती पवार यांनी तात्काळ औषध वाटप करणाऱ्या रुग्णांच्या लाईन मध्ये औषध घेण्यासाठी थांबल्या नंबर आल्यानंतर संबधित कर्मचाऱ्याने रुग्णालयात औषध उपलब्ध नसल्याचे सांगितले.

रुग्णांच्या नाव नोंदणी विभागात कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी लाईन झाली होती वरिष्ठ आधिकाऱ्यांना बोलावुन या बाबत विचारना केली आणि कान उघडणी केली. अचानक मंत्री रुग्णांच्या लाईन मध्ये थांबल्याने प्रशासनाची तारांबळ झाली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment