राजकारण

अमित शाह आणि नारायण राणे यांची भेट ; तपशील गुलदस्त्यात

अनंत गीते वास्तववादी बोलले — राणे

नवी दिल्ली ता २२ — केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची केंद्रीय सूक्ष्म ,लघु आणि मध्यम विभागाचेमंत्री नारायण राणे यांनी आज रात्री ६:१५ मिनिटाला भेट घेतली . मी अमित शाह यांना भेटलो .  सरकारच्या कामकाजाबाबत ही भेट होती .

या भेटीचा या पेक्षा जास्त तपशील मी देणार नाही असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल नारायण राणे म्हणाले .   नारायण राणे यांनी अमित शाह यांची भेट त्यांच्या सरकारी निवासस्थानी घेतली . या भेटीचा तपशील राणे यांनी देण्यास नकार दिला . त्या आधी अनेक दिवसापासून राणे हे शाह यांना भेटू इच्छित होते . पण काही अपरिहार्य कारणामुळे ही भेट लांबत गेली आणि अखेर आज ही भेट झाली .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल केला . नव्या मंत्र्यांना आप- आपल्या भागात जन – आशीर्वाद यात्रा काढायला सांगितली . राणे यांनी ती जन -आशीर्वाद यात्रा काढली .

मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राणे यांनी टीकेचे लक्ष्य केले . उद्धव ठाकरे यांच्या कानाखाली वाजवण्याची भाषा राणे बोलले . उद्या उठून कोणीही मुख्यमंत्र्याच्या विरोधात बोलले . तर मग गप्प बसायचे का हा विचार करून राणे यांना अटक करण्यात आली . राणे यांच्या विरोधात लावलेल्या कलमाप्रमाणे त्यांना जमानत मिळणार हे सरकारला देखील ठाऊक होते . पण अटक करण्याचा निर्णय घेण्यात आला होता .    

मी केंद्रात मंत्री आहे . मला अटक कशी होईल असे संकेत देणारे विधान राणे यांनी केले होते . पण सरकारने अटक करण्याचा निर्णय घेतला . त्यावर पोलीस प्रशासनाने अंमलबजावणी केली . हा घडलेला प्रकार मी अमित शाह यांना कळवेन असे राणे म्हणाले होते . शाह यांना ते एक अहवाल देणार होते . या बाबतचा तपशील राणे यांनी आज सार्वजनिक केला नाही . मात्र मोघम शब्द त्यांनी वापरले . सरकारी कामकाजाबाबत भेट घेऊन चर्चा केली . याविषयी जास्त बोलणार नाही असे म्हणत त्यांनी बोलायचे टाळले .  

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे आणि शिवसेनेचे माजी खासदार अनंत गीते यांच्यात लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये रायगड लोकसभा मतदार संघात सरळ लढत झाली . यात गीते यांचा पराभव झाला . याला २ वर्ष उलटून गेली . राज्यात ३ पक्षाचे सरकार आले . आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक ३ पक्ष कशी लढतील . लोकसभेत शिवसेनेचे १८ राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे ४ आणि कांग्रेसचा एक सदस्य आहे . रायगड मध्ये शिवसेना की राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष हा पेच कायम राहणार आहे . हा प्रकार  अनेक मतदार संघात होणार आहे . यामुळे महाराष्ट्रात आगामी काळात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होऊ शकतील असा अंदाज विदर्भातील एका कांग्रेस नेत्याने बांधला आहे  .

लोकसभेच्या राज्यात ४८ जागा आहेत . या तीन पक्षाचा विचार केला तर समान जागा वाटप झाले तर प्रत्येकी १६ जागा येतील . हा जागा वाटपाचा तिढा मोठा असणार आहे .    

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाची स्थापना कांग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झालेली आहे . आमचे नेते केवळ हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत अन्य कोणी नाही . राज्य सरकार मधील ३ पक्ष ही एक तडजोड आहे ,असे  विधान अनंत गीते यांनी केले .

उद्धव   ठाकरे हे राज्य सरकार सांभाळतील आपण गाव सांभाळू असे गीते शिवसैनिकांपुढे मार्गदर्शन करताना म्हणाले . गीते यांनी खरे विचार मांडले असे राणे म्हणाले . शिवसेना नेतृत्वाची परवानगी नसताना गीते असे बोलू शकत नाहीत असे संकेत देणारे विधान आज रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे -पाटील यांनी केले . ठाकरे सरकार मधील उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले कि ` ते अनंत गीते यांचे व्यक्तिगत मत आहे `. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment