क्रीडा

इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : पंजाबचा कोलकाताला धक्का

राहुलच्या अर्धशतकामुळे पाच गडी राखून विजयी

दुबई : कर्णधार के. एल. राहुलने (६७) केलेल्या अर्धशतकाच्या जोरावर पंजाब किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) शुक्रवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा पाच गडी आणि तीन चेंडू राखून पराभव केला.

कोलकाताने दिलेले १६६ धावांचे आव्हान पंजाबने १९.३ षटकांत पूर्ण केले. त्यांनी १२ सामन्यांत पाचव्या विजयाची नोंद करताना बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. राहुल आणि मयांक अगरवाल यांनी ७० धावांची सलामी दिली. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने मयांक (४०) व निकोलस पूरन (१२) यांना झटपट माघारी पाठवले. मात्र, राहुललला शाहरूख खानची (नाबाद २२) साथ लाभल्याने पंजाबने सामना जिंकला.  तत्पूर्वी, कोलकाताने २० षटकांत ७ बाद १६५ धावा उभारल्या. वेंकटेश अय्यर (६७) आणि राहुल त्रिपाठी (३४) यांनी उत्कृष्ट फलंदाजी केली.

संक्षिप्त धावफलक

कोलकाता नाइट रायडर्स : २० षटकांत ७ बाद १६५ (वेंकटेश अय्यर ६७; अर्शदीप सिंग ३/३२) पराभूत वि. पंजाब किंग्ज : १९.३ षटकांत ५ बाद १६८ (के. एल. राहुल ६७, मयांक अगरवाल ४०; वरुण चक्रवर्ती २/२४)

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment