खान्देश

इम्पेरिअल इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्याने घेतली आपल्याच शाळेत ‘गणपती बनवा’ कार्यशाळा

इम्पेरिअल परिवार नेहमीच आपल्या विद्यार्थ्यांना व त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असतो. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा उद्देश मनाशी बाळगून संस्थेचे चेअरमन नवनवीन उपक्रम राबविण्यासाठी संस्थेतील शिक्षकांना मार्गदर्शन करीत असतात. याची प्रचिती म्हणजे शाळेला आता पर्यंत मिळालेली मानांकने होय. इम्पेरिअल परिवाराने निसर्ग वाचविण्याचा वसा देखील घेतला आहे .

याच कारणामुळे फाउंडर्स डे च्या निमित्ताने शाळा व शाळा बाह्य परिसर या मध्ये सुमारे ३०० झाडे लावून त्यांची जगवण्याची जबाबदारी शाळेने घेतली आहे .


गणपतीचा सण आला म्हणजे आपण सर्व आनंदी असतो पण आपल्या आनंदात आपण निसर्गाला नकळत किती हानी पोहोचवतो ह्याचा आपणास विसर पडतो .

या प्रश्नाला उत्तर म्हणून शाळेने गणपती बनवा कार्यशाळा आयोजित केली . हि शाळेच्याच इयत्ता ७ वि चा विध्यार्थी कु तनिष्क उमेश झंवर याच्या हस्ते पार पडली .

या प्रसंगी शाडू मातीचा वापर करून इको फ्रेंडली गणपती कसा बनवावा हे शिकवले गेले. विध्यार्थ्यानी स्वतः गणपती बनविण्याचा आनंद घेतला . आपल्या पाल्याला शाळेने वेळोवेळी दिलेले प्रोत्साहन बघून तनिष्क चे पालक हे भावविभोर झाले . प्रसंगी शाळेने दिलेले प्रोत्साहन व संधी याचा सर्व विध्यार्थ्यानी चांगला उपयोग करावा व आपली गुणवत्ता अजून वाढवावी असे श्री उमेश झंवर यांनी प्रतिपादन केले .


या प्रसंगी शाळेचे चेअरमन इंजि.नरेश चौधरी उपस्थित होते. त्यांनी गणपती विसर्जन घरच्या घरी कसे करावे व निर्माल्याचा उपयोग झाडांसाठी खत म्हणून कसा करावा या बद्दल माहिती दिली.


या प्रसंगी शाळेचे प्राचार्य श्री महेश कवडे, शाळा व्यवस्थापक श्री गजानन पाटील , सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment