Uncategorized

ऐरोली येथे प.पू.श्री संत अच्युत महाराज यांच्या १० व्या पुण्यस्मरणा निमित्त मौन श्रद्धांजली अर्पण…

मुंबई / प्रतींनिधी

प.पु.श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळ मुंबई, हावरे प्राॅपर्टिज् नवीमुंबई व महाराष्ट्र सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे साजरा करण्यात आला.
यावेळी प.पू.श्री संत अच्युत महाराज यांच्या १० व्या पुण्यस्मरण कार्यक्रमा निमित्त मदर तेरेसा व एम बी ए फौंडेशन या संस्थेच्या अनाथ/ विकलांग मुलांना फळवाटप करण्यात आले. यावेळी महाराष्ट्रातील प्रख्यात प्रसिद्ध गायीका सौ.अरूणा हेगडे यांच्या वतीने “भक्तिरंग” कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी लोकप्रिय भक्तीगीते, अभंग, गौळण, भैरवी गायण केले.


याप्रसंगी ऐरोलीचे आमदार गणेश नाईक, प्रसिद्ध उद्योजक व अणुशास्त्रज्ञ, डॉ. सुरेश हावरे, सौ.नलीनी हावरे, जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार, महाराष्ट्र सेवा संघाचे जयप्रकाश बर्वे, सामाजिक चंद्रशेखरजी वझे, .रमेशजी धामणकर, प्राचार्य डॉ. संजयजी बोकाडे, डॉ. विवेक सुन्नपवार, श्रीनाथ सखा साधक वृंद मुंबईचे संदीप हुद्दार,श्री गजानन महाराज मंदिराचे अध्यक्ष श्री रामदासजी कुटेमाटे, भाजपा नेते अरूणजी पडते, नितीन कुळकर्णी, नगरसेवक अशोक पाटील, समाजसेवक राजेश मढवी, समाजसेवीका अॅड.रंजना वानखडे,अॅड.निवेदिता पोळ, ऐरोली स्पोर्टस असोसिएशनचे सह-खजीनदार आनंद कामत, सह मान्यवर मंडळी व बहुसंख्येने रसीकश्रोते गण उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री संत अच्युत महाराज सत्संग मंडळाचे उपाध्यक्ष प्रा. डॉ. किशोर सावरकर व मनोज वाडेकर यांनी केले, तर ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ हे प्रार्थनागीत सौ.अमीता डांगरे व सौ.प्रणिता कुऱ्हेकर यांनी सादर केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन कु.आयुषी डांगरे हिने तर आभार मंडळाचे सचिव श्री अनंत धर्माळे यांनी मानले. तर कार्यक्रमाची सांगता आरती, राष्ट्रवंदना व महाप्रसादाने झाली, यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment