मराठवाडा

औरंगाबादच्या हर्सुल तुरुंगातील 14 कैदी कोरोनाबाधित

Written by news

औरंगाबाद ( प्रतिनिधी )

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात काही दिवसांपासून कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे नियंत्रणात आली आहे.मात्र काल हर्सूल बंदीगृहातील चक्क 14 आरोपी कोरोना बाधित आढळून आले आहेत , यामुळे पोलीस प्रशासन हादरले आहे.


हर्सूल कारागृहातील 14 कैद्यांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे शहरात तिस-या लाटेचा धोका आता निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे.


शहरात काही दिवसांपासून दररोज केवळ चार ते पाच रुग्ण आढळून येत होते, पण काल( 29 ऑगस्ट ) रविवारी कोरोनाचे 23 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. औरंगाबाद शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे.त्यामुळे नागरिकांमधील भीती कमी होत चालली आहे, मात्र तिसरी लाट येण्याचा धोका असल्याचे जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच जाहीर केले आहे. तरी देखील नागरिकांकडून दुर्लक्ष होत आहे.

महानगरपालिकेने कोरोना चाचण्यांच्या संख्या वाढविल्या आहेत. दररोज सुमारे अडीच हजार चाचण्या होत आहे.

महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या की, हर्सुल तुरुंगातील 14 कैदी पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र त्यांच्यात कोणतेही लक्षणे आढळून आलेली नाहीत. तुरुंगातील एक हजार कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून, सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. या 14 कैद्याना स्वतंत्र ठेवण्यात आले आहे.

कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्याकरिता नागरिकांनी काळजी घ्यावी. गर्दी टाळावी, मास्कचा वापर करावा, सॅनीटायझरचा वापर करावा, सुरक्षित अंतर ठेवावे, असे आवाहन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पाडळकर यांनी केले आहे. तिसऱ्या लाटेबाबत नागरिकांनी सतर्क राहावे आणि कोरोनाच्या नियमावलीचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे.

About the author

news

Leave a Reply

Leave a Comment