पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर देवस्थान समितीला डिजिटल सुरक्षा

कोल्हापूरअंबाबाई देवस्थान व्यवस्थापन समिती पश्चिम महाराष्ट्र कोल्हापूर यांच्या व्यवस्थापनाखाली अंबाबाई मंदिर कोल्हापूर यांनी अतिसंवेदनशील मंदिर परिसरात सुरक्षेच्या उद्देशाने मल्टी झोन ​​डोअर फ्रेम मेटल डिटेक्टर डिजिटल सिस्टीम बसवली आहे. डिजिटल प्रणाली वापरून ही संस्था अत्यंत सुरक्षित बनवल्यामुळे या संस्थेला 2022 मध्ये दिल्लीतील IFSEC-2022 प्रदर्शनात डिजिटल सुरक्षा प्रणालीच्या वापरासाठी नॉमिनेशन मिळाले आहे.

जगभरातील 20 देशांतील 150 कंपन्या जगभरातील सुरक्षा सामग्रीचा पुरवठा करत असतात, यामध्ये कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिर व देवस्थान समितीचा समावेश झाला आहे .पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती संस्थेतील तांत्रिक विभागाचे मुख्य कर्मचारी राहुल जगताप यांना कंपनीच्या माध्यमातून नवीन डिजिटल प्रणालीचा प्रशिक्षण देण्यात आला आहे .राहुल जगताप व श्रीरंग जगताप यांना इन हाऊस इंजिनियर म्हणून या नामांकनात सहभागी होण्याची संधी मिळाली आहे .
2 डिसेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2022 दरम्यान दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमात नॉमिनेशन झालेल्या संस्थांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे .

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment