देश-विदेश

चिपी विमानतळ उद्घाटनावरून भाजप -शिवसेना आमने -सामने

`

सिंधुदुर्ग -मुंबई विमान सेवा ९ ऑक्टोबर पासून प्रारंभ — राणे 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती संशयास्पद “माझ्या अटकेचा अहवाल गृहमंत्र्यांना लवकर देईन `

नवी दिल्ली ता ७ — कोकणातील चिपी या विमानतळावरून शुभारंभीचे विमान सिंधुदुर्ग ते मुंबई या मार्गावर उड्डाण करेल . हे उड्डाण  येत्या ९ ऑक्टोबर रोजी होईल . या प्रसंगी मी हजर असेन अशी माहिती  केंद्रातील सूक्ष्म ,लघु आणि मध्यम विभागाचेमंत्री नारायण राणे यांनी आज दिली .  

त्यांनी आज आपल्या २८ अकबर रोड वरील सरकारी  निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली . यात त्यांनी चिपी विमानतळाच्या उदघाटनाची माहिती दिली .

नागरी विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते या विमानतळाचे उदघाटन होणार आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या उदघाटन प्रसंगी  उपस्थित असण्यावर संशय आहे . त्यांची गरज नाही असे संकेत देणारे विधान राणे यांनी केले .

आज मी सकाळी सव्वा अकरा वाजता शिंदे यांची भेट घेतली . त्यांनी मला विमानतळ उदघाटनाची माहिती दिली . ती माहिती मी प्रसार माध्यमाला देत आहे .   पहिले विमान सिंधुदुर्ग ते मुंबई उड्डाण करेल . यानंतर देशातील अन्य शहरांना विमान मार्गाने जोडले जाईल. आम्ही (नारायण राणे ,निलेश राणे ,नितेश राणे ) स्थानिक आहोत . आमच्या संयुक्त प्रयत्नातून विमानतळ २०१४ मध्ये पूर्ण झाले आहे .

त्या विमानतळाला जोडणारे रस्ते ठीक नसणे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरण याकडून विमान उड्डाणाला   परमिशन मिळायला उशीर झाला .

यामुळे विमान उड्डाणाला विलंब झाला असे संकेत देणारे विधान राणे यांनी केले .    

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी नागरी विमान वाहतूकमंत्र्याकडे वेळोवेळी पत्र व्यवहार करून विमानतळावरून विमान उड्डणांचा मार्ग सुकर केला होता .

याची माहिती त्यांनी दिली होती . त्यांनी पत्रव्यवहार केला असेल . शिवसेना विमानतळ उभारणीचे श्रेय घेत असेल . शिवसेना काय म्हणते . याला काही महत्व नाही असे राणे म्हणाले .  

 मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या तिसऱ्या लाटे बाबत बोलत असतात . त्यांनी खरे तर कोरोनावर बोलूच नये . ते काही सुविधा देऊ शकत नाहीत . कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून ते भीती घालत आहेत . त्यांना  मातोश्रीत बंदिस्थ राहायचे आहे . यामुळे ते असे विधान करत आहेत . देशाच्या अन्य भागात कोरोनाची तिसरी लाट येत नाही . ती लाट महाराष्ष्ट्रातच का येईल असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला .  

 मी मंदिर उघडी करून दवाखाने बंद करू का असा उद्विग्न प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला . यावर बोलताना राणे म्हणाले कि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलतात एक आणि करतात एक .

घरावर दगडफेक करायला ५०० जणांचा समूह एकत्र येतो . त्यांचे स्वागत केले जाते असे राणे म्हणाले . राणे यांच्या घरावर शिवसैनिकांनी दगडफेक केली . त्यांचे स्वागत ठाकरे यांनी केले असे वृत्त सार्वजनिक झालेले आहे .

या आधारावर राणे यांनी मुख्यमंत्री ठाकरे बोलतात एक आणि करतात एक असे ठामपणे म्हंटले .   विनायक राऊत यांनी नवरात्री दिवशी म्हणजे ७ ऑक्टोबर रोजी चिपी विमानतळावरून  पहिले विमान उड्डाण होईल अशी माहिती ५ सप्टेबर रोजी दिली होती . आज राणे यांनी ९ ऑक्टोबर रोजी विमानतळाचे उदघाटन होईल अशी माहिती दिली . अलायन्स एअर ही कंपनी विमानसेवा पुरवणार आहे .    

जन – आशीर्वाद यात्रे प्रसंगी मला झालेल्या अटकेचा अहवाल मी केंद्रीय गृहमंत्री (अमित शाह )यांना देणार आहे असे राणे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हणाले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment