महाराष्ट्र राजकारण

जनआशीर्वाद यात्रा संपल्यानंतर कोकणातून राणेंना धक्का; भाजप नगरसेवक करणार शिवसेनेत प्रवेश

देवगड, 2 सप्टेंबर : भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी कोकणात जनआशीर्वाद यात्रेचं (Janashirvad Yatra) आयोजन केलं होतं. अनेक दिवस ते कोकणातील (Kokan) विविध भागांमध्ये दौरा करीत होते. पत्रकार परिषदा घेत त्यांना महाविकास आघाडी सरकारवर टीकाही केली होती. मात्र राणेंची जनआशीर्वाद यात्रा कोकणवासियांना फारशी आवडली नसल्याचं दिसून येत आहे. देवगडचे दोन नगरसेवक थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं वृत्त समोर आलं आहे.

वर्षा निवास्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनत (Shivsena) पक्ष प्रवेश करणार आहेत. देवगडच्या भाजप नगरसेविका हर्षदा ठाकूर आणि नगरसेवक विकास कोंयडे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

देवगड नगरपालिकेतील नगरसेवक प्रज्ञा ठाकूर आणि प्रकाश कोयडे यांचा मुख्यमंत्रीची उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत थोड्याच वेळात प्रवेश करणार आहेत. कणकवलीची माईन आणि कालमठ ग्राम पंचायतीत निवडून आलेल्या सरपंचांचा धनश्री मेस्त्री, प्रज्ञा मिस्त्री याचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी जन आशीर्वादवर ओढले तारेशे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, दुर्दैवाने काय झालेलं आहे, जनता जगली काय आणि त्यांचे प्राण गेले काय आम्हाला 100 टक्के राजकारण करायचं आहे असं सुरू आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका असतानाही आम्हाला यात्रा काढायच्या आहेत. आम्हाला जनतेसाठी सोयी सुविधा काही करायच्या नाहीयेत पण त्यांचे जीव कदाचित धोक्यात येतील असे समारंभ करायचे आहेत का तर आम्हाला जनतेचे आशीर्वाद पाहिजेत. कशाला आशीर्वाद हवेत जनतेचे जीव धोक्यात घालायला? असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवरुन टोला लगावला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment