खान्देश

जळगावच्या खवय्यांसाठी मेहरुण तलावाच्या किनारी रंगला “भजी महोत्सव”

Written by news

जळगाव – जळगावला एक सांस्कृतिक परंपरा लाभली आहे. एव्हढेच नव्हे तर हे शहर सुवर्णनगरी आणि बनाना , कॉटन सिटी म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.पावसाळी आणि आल्हाददायक वातावरणात निसर्गरम्य , ऐतिहासिक मेहरूण तलावाच्या किनारी नाविन्यपूर्ण ” भजी महोत्सवाला ” जळगावचे सुजाण नागरिक आणि खवय्ये यांनी उदंड प्रतिसाद दिला .

भाजी महोत्सवाचा आस्वाद घेताना जळगाववासी


या भजी महोत्सवात 10 प्रकारच्या विविध गरमागरम भजींचा मनसोक्त आस्वाद खवय्यांनी घेतला. बटाटे , गिलके , मेथी , कांदा , पालक , मिरची , गोड भजे , कोथंबीर असे विविध भजी तयार करण्यात आली होती. भजींसोबत जिलेबी, वाफाळलेला चहा हा होताच…!


जळगाव महापालिकेचे आयुक्त डॉ.सतीश कुलकर्णी, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंडे यांची उपस्थिती होती . मान्यवरांमध्ये उद्योजक अतुल जैन , सामाजिक कार्यकर्ते आणि कलावंत तुषार वाघुळदे , दीपस्तंभ संस्थेचे यजुर्वेद महाजन , नृत्यगुरू मनिष सातपुते, शिक्षण प्रेमी नरेश चौधरी , रंगकर्मी पुरुषोत्तम पाटील , उद्योजक सुबोध चौधरी , अनिल जोशी यासह सर्वच क्षेत्रातील प्रतिष्ठित आवर्जून उपस्थित होते हे विशेष .. !!

अधून मधून पावसाची रिमझिम सुरू होती. अनेक नागरिक आपल्या बाल- गोपालांसह उपस्थित होते.. काहींनी घोडे स्वारीचाही आनंद लुटला. या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन मराठी प्रतिष्ठानचे जमील देशपांडे , विजयकुमार वाणी यांनी केले. या भजी महोत्सवाला शेकडो नागरिकांनी प्रतिसाद दिला.

( तुषार वाघुळदे )


दोन वर्षांपूर्वी भरीत महोत्सव घेण्यात आला होता , याची नोंद जागतिक पातळीवर झाली होती. त्याचेही आयोजन मराठी प्रतिष्ठाननेच केले होते. ऑक्टोबरमध्ये ” मिसळ महोत्सव ” घेण्यात येणार असल्याचे याप्रसंगी जाहीर करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक तुषार वाघुळदे यांनी केले .आभार जमील देशपांडे यांनी मानले.

About the author

news

Leave a Reply

Leave a Comment