महाराष्ट्र मुंबई

ट्रक व कारचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, एक जखमी

पालघर –

मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धानिवरी नजीक मालवाहू ट्रक आणि कारचा भीषण असा अपघात घडला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी आहे.

मालवाहू ट्रक आणि कारचा  मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर दुपारी तीन वाजताच्या सुमारास अपघात घडला आहे. महामार्गावर समोरील वाहनाचा अंदाज न आल्याने ब्रिझा कारने मालवाहू वाहनाला मागून जोरदार धडक दिली. अपघातात कारमधील चार जण गंभीर रित्या जखमी झाले, अपघातानंतर काही वेळातच जखमींना कासा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अपघातात जखमी कारमध्ये प्रवास करणाऱ्या तिघांना मृत घोषित केले. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर एक जण जखमी झाला आहे. दिपक अग्रवाल, सुमित्रा अग्रवाल, सत्यनारायण अग्रवाल अशी या अपघातात मृत झालेल्या तिघांची नावे असून अपघातात जखमी केतन अग्रवाल यंच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment