देश-विदेश राजकारण

देवेंद्र फडणवीस गोव्याचे निवडणूक प्रभारी नियुक्त

राष्ट्रपती ,उपराष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीकरता  या निवडणुकांना महत्व 
नवी दिल्ली ता ८ —

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गोवा विधानसभा निवडणुकीसाठी प्रभारी असतील . याची घोषणा आज केंद्रीय कार्यलयातून करण्यात आली .    

भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय कार्यालय हे ६ दीनदयाळ उपाध्याय मार्गावर आहे . याचे मुख्यालय प्रभारी राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग आहेत . पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शाह ,भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या सहमतीनंतर अरुण सिंग यांनी संबंधित यादी जाहीर केली .

फडणवीस यांना सहकार्य करण्यासाठी केंद्रीय पर्यटनमंत्री जी किशन रेड्डी ,केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्रीमती दर्शना जर्दोश यांची  सह – प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे . या नव्या नियुक्त्या तातडीने लागू झालेल्या आहेत .     देवेंद्र फडणवीस या आधी बिहार विधानसभा निवडणुकीचे प्रभारी होते .

आधी फडणवीस यांनी बिहार मध्ये काम करायला सुरुवात केली आणि नंतर पक्षाने त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली . मात्र गोवा विधानसभा निवडणुकीआधीच फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे .   आगामी काळात उत्तर प्रदेश ,उत्तराखंड ,पंजाब ,मणिपूर आणि गोवा राज्याच्या विधानसभा निवडणूका  होणार आहेत . या निवडणूका  फेब्रुवारी २०२२ मध्ये अपेक्षित आहेत .

या निवडणूका झाल्यानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभेच्या निवडणुका अपेक्षित आहेत . उत्तर प्रदेश ,उत्तराखंडमध्ये भाजपचे स्वबळाचे सरकार आहे . मणिपूर आणि गोवा राज्यात भाजपचे मुख्यमंत्री आहेत . मात्र तत्कालीन भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी अन्य पक्षाच्या आमदारांचे मन वळवून मणिपूर आणि गोव्यात आपले सरकार बनवले .

पंजाब राज्यात कांग्रेसचे सरकार आहे . या ५ ही राज्यातील विधानसभा निवडणुकीला खूप महत्व प्राप्त झालेले आहे . कारण जून २०२२ मध्ये राष्ट्रपती आणि ऑगस्ट २०२२ मध्ये उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे . राष्ट्रपती पदासाठी खासदार आणि आमदार मतदान करत असतात . तर उपराष्ट्रपती पदासाठी केवळ खासदार मतदान करत असतात .

आमदारांच्या संख्येवर राज्यसभेत खासदार होता येते .      

निवडणूक प्रभारी हा भाजप अध्यक्षाचा प्रतिनिधी या नात्याने काम करत असतो . पक्षाची उमेदवारी देण्यात या निवडणूक प्रभारीचा सिंहाचा वाटा असतो . बिहार राज्यात नितीश कुमार मुख्यमंत्री( जनता दल संयुक्त ) आहेत . त्यात भाजपचा समावेश आहे . तेथे युतीचे सरकार आहे .

यामुळे फडणवीस यांच्या वाटेला  यश आले . आता पंतप्रधान नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शाह , भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि पक्षातील अन्य नेत्यांबरोबर  बरोबर संवाद साधून फडणवीस आपले करणार आहेत .याची माहिती स्वतः फडणवीस यांनी प्रसार माध्यमाला दिली  .

भाजपने निवडणूक होणाऱ्या अन्य ४ राज्याचे प्रभारी आणि सह -प्रभारी आजच नियुक्त केले आहेत . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment