निवडणूक आयोगाने उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या ५ राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या राज्यांमध्ये एकूण ७ टप्प्यांत मतदान होणार आहे. तर १० मार्चला मतमोजणी होणार आहे.
६९० मतदारसंघात या निवडणुका होतील. यापैकी गोव्यातले ४०, मणिपूरमधील ६०, पंजाबमधील १७०, उत्तराखंडमधील ७० आणि उत्तर प्रदेशमधील ४०३ निवडणुकांचा समावेश आहे.
पहिला टप्पा १० फेब्रुवारीला होईल. यामध्ये उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी १४ जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख २१ जानेवारी, मागे घेण्याची तारीख २७ जानेवारी असेल. तर मतदान १० फेब्रुवारीला होईल.
दुसऱ्या टप्प्यात टप्प्यात ४ राज्यांमधे निवडणुका होतील. उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा. २१ जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख २८ जानेवारी, मागे घेण्याची मुदत ३१ जानेवारी तर मतदानाची तारीख १४ फेब्रुवारी असेल.
तिसऱ्या टप्प्यात फक्त उत्तर प्रदेशचा तिसरा टप्पा होईल. नोटिफिकेशन २५ जानेवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १ फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत ४ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २० फेब्रुवारी असेल. तर चौथ्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख २७ जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख ३ जानेवारी, मागे घेण्याची तारीख ७ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख २३ फेब्रुवारी असेल.
पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा यासाठी मतदान होईल. नोटिफिकेशन १ फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख ८ फेब्रुवारी असेल. मागे घेण्याची तारीख ११ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख २७ फेब्रुवारी असेल. सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूर दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन ४ फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख ११ फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख १६ फेब्रुवारी तर मतदानाची तारीख ३ मार्च असेल. तर सातव्या टप्प्यात उत्तर प्रदेशच्या सातव्या टप्प्यासाठी नोटिफिकेशन १० फेब्रुवारीला निघेल. अर्ज भरण्याची तारीख १७ फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख २१ फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख ७ मार्च असेल.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग म्हणाले आहे की, सर्व निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फ्रंटलाईन वर्कर्स मानलं जाईल. त्यांना बूस्टर डोस दिला जाईल. बूथवर सॅनिटायझर वगैरे सर्व व्यवस्था असेल. आम्ही मुख्य सचिवांना सांगितलं आहे की जास्तीत जास्त मतदारांना लसीकरण केलं जावं. ७ जानेवारीपर्यंत गोव्यात ९५ टक्के लोकांना दोन्ही डोस झाले आहेत. उत्तराखंडमध्ये ९९.६ टक्के पहिला तर ८३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. उत्तर प्रदेशात ९० टक्के लोकांना पहिला तर ५२ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. पंजाबमध्ये ८२ टक्के पहिला तर ४६ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. मणिपूरमध्ये ५७ टक्के लोकांना पहिला तर ४३ टक्के लोकांना दुसरा डोस दिला आहे. या पाच राज्यांमधल्या एकूण १५ कोटी लोकांना पहिला तर ९ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. असे आयोगाने म्हटले आहे.