क्रीडा

धक्कादायक! शिखर धवनने घेतला घटस्फोट, आयशा मुखर्जीची इमोशनल पोस्ट

नवी दिल्ली, 7 सप्टेंबर : भारताचा ओपनर शिखर धवनबाबतचं (Shikhar Dhawan Divorce) एक मोठं वृत्त समोर येत आहे. शिखर धवनची पत्नी आयशा मुखर्जीने (Ayesha Mukherjee) इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेयर केली आहे, त्यात तिने घटस्फोटाबाबतचं आपलं मत व्यक्त केलं आहे. तसंच दोनवेळा घटस्फोट घेतल्यानंतर आपल्याला काय वाटतं, याबाबत तिने आपलं मत मांडलं आहे. आयशाच्या या पोस्टनंतर शिखर धवनचा घटस्फोट झाल्याचं समोर येत आहे. धवन आणि आयशा यांनी 2009 साली साखरपुडा केला होता, यानंतर तीन वर्षांनी दोघांनी लग्न केलं. आयशाने याआधी आपल्या पहिल्या नवऱ्यापासूनही घटस्फोट घेतला होता. पहिल्या नवऱ्यापासून आयशाला 2 मुली होत्या.

शिखर धवनने आपल्यापेक्षा 10 वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं तेव्हा त्याला खूप टोमणे ऐकावे लागले. पण शिखरच्या कुटुंबाने त्याची साथ दिली. 2014 साली आयशाने एका मुलाला जन्म दिला, ज्याचं नाव जोरावर धवन आहे. धवनने अनेकवेळा बोलताना आयशासोबत लग्न केल्यानंतर आयुष्यात एक क्रिकेटर म्हणून आणि माणूस म्हणून कसे बदल झाले हे सांगितलं.

शिखर धवनने याबाबत अजून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. याआधी शिखर आणि आयशा यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवर अनफॉलो केल्याचं वृत्त आलं होतं. एवढच नाही तर आयशाने शिखरसोबतचे आपले फोटोही डिलीट केले आहेत.

पश्चिम बंगालमधून आलेली आयशा आपल्या पोस्टमध्ये म्हणाली, ‘दोन वेळा घटस्फोट घ्यायच्या आधी घटस्फोट हा शब्द घाणेरडा वाटत होता. खूप काही सिद्ध करायचं होतं. जेव्हा माझं दुसरं लग्न तुटलं तेव्हा हे खूप भीतीदायक होतं. पहिल्यांदा घटस्फोट झाला तेव्हा मला वाटलं मी खूप अपयशी आहे,’ असं आयशा म्हणाली.

‘मला वाटलं जसं मी सगळ्यांना खाली दाखवलं आणि स्वार्थी वागले. आई-वडिलांना मुलांना कमी दाखवत आहे, असं वाटलं. एवढच नाही तर देवाचाही अपमान केला, असं मला वाटलं,’ अशी पोस्ट आयशाने लिहिली.

शिखर धवनने मात्र याबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. धवन आता आयपीएलसाठी युएईला रवाना होईल. तो आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळतो. धवनने आपल्या करियरमध्ये 34 टेस्ट, 145 वनडे आणि 68 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या. नुकत्याच श्रीलंकेत झालेल्या वनडे आणि टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये धवनने टीम इंडियाचं नेतृत्व केलं होतं.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment