खान्देश

धुळ्यात बसचा भीषण अपघात, जखमींमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश…

धुळे-आज सकाळच्या सुमारास धुळ्यात एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघात जवळपास २० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. समोरून येणाऱ्या वाहनाने हुलकावणी दिल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त बस ही चाळीसगाव येथून प्रवाशांना घेऊन अक्कलकुवाकडे निघाली होती. सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास बस धुळे तालुक्यातील तरवाडे गावाजवळ आली, त्यात सकाळच्या सुमारास शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. ह्या विद्यार्थ्याना आणि प्रवाश्यांना घेऊन ही बस धुळ्याकडे रवाना झाली. तरवडे गाव सोडून 2 किलोमिटर अंतरावर धुळ्याकडून चाळीसगाव कडे भरधाव वेगात येणाऱ्या एका वाहनाने बसला हुलकावणी दिली. यात बस थेट रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. या भीषण अपघातात जवळपास २० प्रवासी जखमी झाले असून त्यात शाळकरी विद्यार्थ्यांची संख्या अधिक असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बसमध्ये अडकून पडलेल्या प्रवाशांना आणि विद्यार्थ्यांना पोलिसांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढले. जखमींना तातडीने उपचारासाठी जवळच्या धुळे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. सुदैवाने बसचा वेग कमी असल्याने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, अपघातात बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment