महाराष्ट्र

नारायण राणे आणि अमित शाह भेट लांबणीवर

नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात १५ मिनीटावरून शब्द युद्ध 

नवी दिल्ली ता ८ — केंद्रीय सूक्ष्म ,लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची आज दिल्लीत भेट होणार होती . पण ही भेट आज झाली नाही असे कळले .   मी अमित शाह यांना उद्या भेटेन आणि माझ्या अटकेचा   अहवाल त्यांना सुपूर्द करेन असे नारायण राणे यांनी काल पत्रकार परिषदेत म्हटले होते . मात्र आज नारायण राणे हे अमित शाह यांना भेटू शकले नाहीत .

आम्ही अमित शाह यांना भेटण्यासाठी वेळ मागितली नव्हती अशी माहिती नारायण राणे यांच्या कार्यालयातून देण्यात आली .    अमित शाह हे लवकर कोणालाही भेटत नाहीत . त्यामुळे नारायण राणे यांना भेटण्याची वेळ दिली नसावी असे विधान भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने खासगीत केले .    

नारायण राणे केंद्रात मंत्री झाले . त्यांच्या सोबत महाराष्ट्रातील डॉ भारती पवार ,कपिल पाटील आणि भागवत कराड मंत्री झाले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मंत्रीमंडळाचा अलीकडेच विस्तार आणि फेरबदल केला . यात महाराष्ट्रातून ४ जणांचा समावेश झाला . यात राणे कॅबिनेट मंत्री तर पवार ,पाटील आणि कराड हे राज्यमंत्री आहेत . मग यांनी जन -आशीर्वाद यात्रा काढावी अशा सूचना पक्षाने खास करून मोदी यांनी दिल्या . सर्व मंत्र्यांनी जन – आशीर्वाद यात्रा काढली . मात्र नारायण राणे यांनी शिवसेनेवर आणि खास करून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध चौफेर बोलाय लागल्यावर त्यांना अटक करण्यात आली .

एका कॅबिनेट मंत्र्याला अटक झाली . हे प्रकरण देशभर गाजले . याचा अहवाल राणे यांनी तयार केला आहे . तो अहवाल ते अमित शाह यांना देणार आहेत . यासाठी त्यांना अमित शाह यांना भेटायचे आहे . मात्र ही भेट लांबणीवर पडत आहे .  

 नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात चिपळूण -पिरोळे ( चिपी ) विमानतळ उदघाटनावरून वाद उफाळून आला आहे . शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी ५ सप्टेंबर रोजी चिपी विमानतळाचे उदघाटन ७ ऑक्टोबर रोजी होणार अशी माहिती दिली . मात्र काल राणे यांनी विमानतळाचे उदघाटन ९ ऑक्टोबर रोजी होणार अशी घोषणा केली . मी (नारायण राणे ) आणि विमानवाहतूकमंत्री ज्योतिरादित्य शिंदे मंगळवारी ११ : १५ वाजता भेटलो आणि विमानतळ उदघाटनाची तारीख ९ ऑक्टोबर ठरली असे राणे म्हणाले .

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता फोनवरून संभाषण करून विमानतळ उदघाटनाची तारीख ९ ऑक्टोबर ठरवली अशी माहिती शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी दिली .    उद्धव ठाकरे आणि ज्योतिरादित्य शिंदे ११ वाजता बोलले तर राणे आणि शिंदे ११ वाजून १५ मिनिटाला भेटले . उभय बाजूत १५ मिनीटावरून राजकारण सूर झालेले आहे . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment