नितीन गडकरी यांच्या तुलनेत २० टक्के जास्त आणि चांगले काम हवे
नवी दिल्ली ता ९ — मी लवकरच माजी केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर राहत असलेल्या ६ कुश रोड या निवासस्थानी राहायला जाणार आहे . तो बंगला २८ अकबर रोड या बंगल्याच्या तुलनेत मोठा आहे . तेथे पत्रकारांना बोलावून पत्रकार परिषद घेणे सोपे जाणार आहे .
कारण तेथे मोठ्या प्रमाणात खुली जागा हिरवळ गवतान आच्छादित आहे असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल केंद्रीय सुक्ष्म ,लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे म्हणाले . नितीन गडकरी यांच्याकडे असलेले सुक्ष्म,लघु आणि मध्यम मंत्रालय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढून घेतले . ते मंत्रालय मोदी यांनी राणे यांना दिले .
प्रकाश जावडेकर हे माहिती आणि प्रसरण , पर्यावरण ,वन आणि हवामान बदल , अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम हे तीन मंत्रालय सांभाळत असताना मोदी यांनी आपला विशेष अधिकार वापरत जावडेकर यांना मंत्रालयाचा राजीनामा देण्यास सांगितले आणि त्यावर अमलबजावणी केली . आता जावडेकर केवळ राज्यसभेचे खासदार आहेत .
प्रकाश जावडेकर यांना कोणत्यातरी राज्याचे राज्यपाल केले जावे असा प्रयत्न नितीन गडकरी करत आहेत . प्रकाश जावडेकर हे कॅबिनेट मंत्री होते . त्यांनी राजीनामा दिल्याने महाराष्ट्रातून नारायण राणे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले .
राणे माजी मुख्यमंत्री असल्याने ते केंद्रात कॅबिनेट मंत्री झाले . ते सध्या २८ अकबर रोड वरील सरकारी निवासस्थानी राहत आहेत . ते मंत्री झाल्याने भेटी घेणाऱ्याची गर्दी वाढली आहे . राणे हे शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बोलत असल्याने दिल्लीतील शिवसेनेचे लक्ष्य राणे यांचा बंगला झालेला आहे .
राणे यांना महाराष्ट्रात अटक झाली . त्या दिवशी दिल्ली शिवसेना प्रमुख संदीप चौधरी यांनी अनेक शिवसैनिकांसोबत राणे यांच्या बंगल्यासमोर विरोध प्रदर्शन केले . शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी त्या शिवसैनिकांचे अभिनंदन केले होते .
प्रकाश जावडेकर यांना ६ कुशक रोड हा सरकारी बंगला रिकामी करण्यास सांगण्यात आले आहे असे कळले . प्रकाश जावडेकर हे राज्यसभा खासदार असल्याने त्यांना आता लहान बंगल्यात राहण्यास जावे लागेल . प्रकाश जावडेकर हे २४ महादेव रोड बंगल्यात जाण्याचा विचार करत आहेत . त्या बंगल्यात सध्या राजीव सातव यांचे कुटुंब राहते .
राजीव सातव यांचे निधन झाल्याने तो बंगला त्या कुटुंबाला खाली करावा लागेल . त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने बंगला खाली करण्यास नोव्हेंबर २०२१ ची मुदत दिली आहे .
केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील राज्यसभा निवडणुकीचा कार्यक्रम आजच जाहीर केला आहे . राजीव सातव यांचे निधन झाल्याने त्या रिक्त जागेवर निवडणूक होत आहे .
यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २२ सप्टेबर आहे . या निवडणुकीसाठी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे . त्याच दिवशी निवडणूक निकाल येईल . काँग्रेस पक्ष राजीव सातव यांच्या पत्नीला (प्रज्ञा सातव ) उमेदवारी देणार असल्याचे कळते .
त्या निवडून आल्या तर त्यांना २४ महादेव रोड हा बंगला खाली करण्याची आवश्यकता भासणार नाही . प्रकाश जावडेकर आणि प्रज्ञा सातव बंगल्याविषयी अंतिम निर्णय घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे . राजीव सातव यांच्या पत्नीला उमेदवारी मिळाली नाही तर ते कुटुंब नोव्हेंबर महिन्यात २४ महादेव रोड बंगला खाली करतील असे कळते .
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू हे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास , शालेय शिक्षण ,महिला व बाल विकास विभागाचे राज्यमंत्री आहेत . त्यांनी १ सप्टेंबर रोजी नितीन गडकरी यांची भेट घेतली .
त्यांनी आपल्या मतदार संघातील कांही समस्या सोडवण्यासाठी नितीन गडकरी यांना पत्र दिले . त्या पत्रात नितीन गडकरी हे सुक्ष्म ,लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री आहेत असा उल्लेख केला . ते खात आता नारायण राणे यांच्याकडे आहे .
नितीन गडकरी यांच्याकडे नाही असे त्यांच्या लक्ष्यात आणून दिल्यावर बच्चू कडू यांनी माझ्या स्वीय सहायकाला याची माहिती नसावी असे म्हणत ते थोडे हसले होते . नारायण राणे यांनी मला माझ्या मंत्रालयाचे नितीन गडकरी यांच्या तुलनेत २० टक्के काम जास्त आणि चांगले करायचे आहे असे आदेश आपल्या अधिकाऱ्याला दिल्याचे समजले .