महाराष्ट्र विदर्भ

निलेशकुमार इंगोले यांना राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर

५ सप्टेंबर २०२१ ला शिक्षक दिनानिमित्ताने निलेशकुमार इंगोले यांना शैक्षणिक दीपस्तंभच्या वतीने राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला.

शैक्षणिक दीपस्तंभ तर्फे दरवर्षी शिक्षक दिनाला महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांचा राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. शैक्षणिक दिपस्तंभच्या संपादकीय मंडळाच्या वतीने उत्कृष्ट शैक्षणिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना राज्यस्तरावर हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.

या वर्षी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून प्राप्त झालेल्या प्रस्तावांची निवड समितीच्या मार्फत परीक्षण करून राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कारासाठी शिक्षकांची निवड करण्यात आली. यात मोर्शी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा बऱ्हाणपूर येथील सहाय्यक शिक्षक, निलेशकुमार रामभाऊजी इंगोले यांची शैक्षणिक दीपस्तंभ कडून राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्कार सन २०२१ करिता निवड करण्यात आली आहे.

निलेशकुमार इंगोले यांचे विद्यार्थ्यांसाठी विविध नवोपक्रम, सामाजिक जनजागृती कार्यक्रम, वृक्षसंवर्धन, कोरोना काळातील शैक्षणिक, सामाजिक योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार निवड समितीने जाहीर केला आहे.

यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद अमरावती च्यावतीने जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचे सेवास्तंभचे विभागीय अध्यक्ष आर.एस.तायडे, शिक्षण विस्तार अधिकारी ज्ञानेश्‍वर गायकवाड, केंद्रप्रमुख सुरेश डोंगरदिवे, शैक्षणिक दीपस्तंभ अध्यक्ष व संपादक सुदाम साळुंखे, अहमदनगर, उपाध्यक्ष धनराज सूर्यवंशी, लातूर व समस्त सहसंपादक वैशाली भामरे नाशिक, रूपाली वडकर नांदेड, जया कुलथे अहमदनगर, वर्षा सांगवीकर लातूर, वैशाली सावंत, प्रमिला सेनकुडे नांदेड व कविता फुदाले उस्मानाबाद तसेच तंत्रस्नेही शिक्षक समूह महाराष्ट्र राज्याच्या सर्व सदस्यांनी व शिक्षकवृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment