पश्चिम महाराष्ट्र

निसर्गाची किमया न्यारी…झाडाला लागले बटाटे

आंबेगाव ” पुणे ” – बटाटा हे कंदमुळं आहे, अशीच त्याची ओळख आहे कारण ते जमिनीखाली उगवते. पण हे बटाटे जेव्हा जमिनीच्या वर झाडाला येतात तेव्हा. आश्चर्य वाटलं ना.. पण खर आहे पुणे जिल्ह्यातच आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर या गावात चक्क झाडाला बटाटे लागले आहेत. युवा शेतकरी संदीप आणि धनेश पांडुरंग वळसे पाटील यांच्या शेतात असणाऱ्या झाडाला चक्क १८ ते १९बटाटे लगडले आहेत. हे बटाटे.पाहण्यासाठी नागरिक गर्दी करू लागले आहेत.

आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथे माळरानावर वळसे पाटील यांची शेती आहे. साडेतीन एकरावर त्यांनी बटाट्याची लागवड केली आहे. बटाटा पीक काढणीला आलेला आहे. अंतिम टप्प्यातील पाला काढण्याचे काम सुरू आहे. या पाल्याची कापणी करत असताना वळसे पाटील यांना त्यांच्या पिकातील एका झाडाला चक्क बटाटे आलेले दिसले. हे बटाटे त्यांनी पाहिल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. कारण एवढे दिवस बटाटे लागवड करत आसताना आतापर्यंत अशी गोष्ट पहायला मिळाली नाही. मात्र यंदाच्या वर्षी बटाटा चक्क जमिनीच्या वर आल्याने त्यांना आश्चर्य वाटले.

आंबेगाव तालुक्यात बटाटा पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. बाजारभावही बटाट्याला चांगला मिळतो. या भागात अनेक ठिकाणी बटाटे काढणीला आले आहेत. जमिनीत बटाटे येतात तसेच हे बटाटे जमिनीच्या वर आले आहेत. थडीमुळे जमिनी खालचा बटाटा हिरवा पडतो त्याचा प्रमाणे हा बटाटा देखील हिरवा पडला आहे. वर बटाटा आल्याने परिसरात हा कुतूहालाचा विषय होत असून परिसरात शेतकरी हा जमिनीवर आलेला बटाटा बघण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.

आजच्या आधुनिक शेतीत अनेक वेगवेगळे प्रयोग घेतले जात आहेत. त्यातून अनेक युवा शेतकरी शेतीला पुढे नेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अनेक पारंपारिक ठराविक ऋतूत निघणारी पिके आता आधूनिकीकरणामुळे सगळ्या ऋतूमध्ये घेता येऊ लागली आहेत. बटाटा हे शक्यतो मुरमाड जनिमिनिवर येणार पीक आहे. मात्र झाडाला जमिनीच्या वर आलेले बटाटे हा मात्र पहिलीच घटना घडली असावी. एका झाडाला १८ ते १९ बटाटे म्हंजे पीक सुद्धा तेवढ्याच जोमात आले आहे. आंबेगाव तालुक्यात जमिनीवर आलेल्या बटाटा बघण्यासाठी परिसरातील शेतकरी, नागरिक गर्दी करू लागले आहेत. येणाऱ्या काळात जमिनीवर देखील बटाटा येऊ शकतो, असे म्हंटले तर आश्चर्य वाटायला नको, असेच हे उदाहरण म्हणावे लागेल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment