देश-विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी रुग्णालयाच्या ठिकाणी गेल्यास स्वागत करू – पवन खेडा

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २७  —  

पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑक्सीजन युक्त रुग्णालयाच्या बांधकाम ठिकाणी गेले असते तर त्यांचे कांग्रेस पक्षाने स्वागत केले असते असे कांग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी एका प्रश्नाच्या उत्तरादाखल म्हटले . 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट्रल व्हिस्टा या नावाने परिचित असलेल्या नव्या संसद ,संसदीय कार्यालय ,पंतप्रधानाचे निवासस्थान या बांधकाम होत असलेल्या ठिकाणी भेट दिली . ही भेट म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे . अशा अविचारी घटनांवर आम्ही काही प्रतिक्रिया देणार नाही असे कांग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा म्हणाले .  

आपल्या देशात ३ महिन्यापूर्वी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत होता . रुग्णालयात उपचारासाठी पलंग मिळत नव्हते  . अनेकांचे नातेवाईक वेळेवर वैद्यकीय सेवा न मिळाल्याने मरण पावले . मात्र नरेंद्र मोदी नव्या रुग्णालयाच्या बांधकाम स्थळी  गेले नाहीत . रुग्णालयात मुबलक ऑक्सीजन पुरवठा होत राहील अशा अद्यावत रुग्णालयाचे  बांधकाम होत असलेल्या जागी मोदी गेले नाहीत . सर्व सोयी आणि सुविधांनी युक्त अशा रुग्णालयाचे  बांधकाम होत असलेल्या ठिकाणी मोदी गेले असते तर कांग्रेस पक्षाने त्यांचे स्वागत केले असते असे पवन खेडा म्हणाले .    

केंद्र सरकार २० ते ३० हजार कोटी रुपये खर्च करून सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचे बांधकाम करत आहे . कोरोना काळात हा प्रकल्प लांबणीवर टाकावा अशी मागणी सतत कांग्रेस पक्षाने केली . मात्र मोदी सरकराने हा प्रकल्प जलद गतीने काम करण्यास हाती घेतला आहे . त्या आपल्या अतिशय महत्वकांक्षाची प्रकल्पाच्या जागी मोदी यांनी भेट दिली . सेंट्रल व्हिस्टा यावर वायफळ खर्च केला जात आहे असा कांग्रेसचा आरोप आहे . सध्या आपण दुःख ,वेदना यातून बाहेर येत असताना मोदी नव्या संसद इमारत बांधकाम ठिकाणी गेले . अशा कृत्याला काय म्हणाले माफ करा असे पवन खेडा म्हणाले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment