देश-विदेश राजकारण

पक्ष संघटनेत बदल नाही – देवेंद्र फडणवीस

महाराष्ट्रातील भाजप सरकार बाबत गंमत

कमलेश गायकवाड
नवी दिल्ली ता २६ — भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेश पातळीवर संघटनेत कोणतेही बदल होणार नाहीत असे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आज येथे  म्हटले.


मी आणि भाजप अध्यक्ष चंद्रकांत पाटील दिल्लीत आलो होतो.आम्ही महाराष्ट्र प्रभारी सी. टी .रवी आणि सरचिटणीस ( भाजप संघटना ) बी. एल. संतोष  यांच्या बरोबर किमान पाच तास चर्चा केली . पक्ष संघटना बांधणी आणि आढावा या दोन मुद्यावर आम्ही चर्चा केली असे फडणवीस म्हणाले.


केंद्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी आज महाराष्ट्रात येत्या मार्च २०२२ मध्ये सत्ता बदल होईल असे भाकीत केले. या बाबत प्रश्न विचारल्यावर  फडणवीस हसले आणि  म्हणाले की मी संबंधित विधान ऐकले नाही.


नागपूर विधान परिषद  निवडणुकीत  कांग्रेसला  काही तरी चमत्कार होईल असे वाटत आहे. मात्र नागपूर मध्ये काही चमत्कार घडणार नाही .तेथे चंद्रशेखर बावनकुळे हे विजयी होतील असा ठाम विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment