बाळ सहा महिन्यांचं होईपर्यंत त्याला फक्त आईचं दूध द्यावं आणि त्यानंतर हळूहळू दुसरं अन्न द्यावं असं सांगतात. पण मुलं शाळेला जाऊ लागेपर्यंत त्याला स्तनपान देणं फायद्याचं ठरू शकतं का?
आपल्या पाच वर्षांच्या मुलाला आणि दोन वर्षांच्या बाळाला स्तनपान देणाऱ्या एका आईचं मात्र असं म्हणणं आहे की तिची मुलं क्वचितच आजारी पडतात आणि अशा पद्धतीने स्तनपान देणं हे चांगलं आहे. एमा शार्डर्लो हडसन (वय 29) असं त्यांचं नाव आहं. त्या म्हणतात दुधात अँटीबॉडीज असतात आणि ते मुलांना उपयुक्त ठरतं. यूकेमध्ये मुलांना जेव्हापर्यंत हवं आहे आणि आईला योग्य वाटते तोपर्यंत स्तनपान देण्याचा सल्ला देण्यात येतो. स्त्रियांनी कधी स्तनपान थांबवावं, याबाबत NHS कोणताही सल्ला देत नाही. आईचं दूध बाळासाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी अत्यावश्यक असतं. त्याशिवाय काहीही दिलं जाऊ नये, असं सल्ला दिला जातो. 6 महिन्यांनंतर इतर अन्न दिलं जातं. बाळाचं आरोग्य उत्तम राहावं, हेचं यामागचं मुख्य कारण आहे.
स्तनपान हाच सर्वोत्तम उपाय
स्तनपानाचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतात. याविषयी सगळ्या आरोग्यतज्ज्ञांमध्ये एकवाक्यता आहे. स्तनपानामुळे संसर्ग होत नाही. तसंच डायरिया, उलट्या होत नाही. तसंच नंतरच्या आयुष्यात लठ्ठपणा आणि इतर रोगांपासून बचाव होतो. स्तनपानामुळे स्त्रियांना स्तन आणि ओव्हरीच्या कर्करोगाचा धोकाही कमी होतो.
पण किती काळ?
NHSच्या वेबसाईटनुसार इतर अन्नाबरोबर वयाच्या दोन वर्षांपर्यंत स्तनपान करणं योग्य वाटतं. तुम्ही आणि तुमचं मूल हवा तितका काळ स्तनपानाचा आनंद घेऊ शकता, असंही या वेबसाईटवर म्हटलं आहे. स्तनपान दोन वर्षं किंवा त्यापेक्षा अधिक काळ सुरू ठेवू शकतो, यावर जागतिक आरोग्य संघटनाही सहमत आहे. पण रॉयल कॉलेज ऑफ पेडिअॅट्रिक्स अँड चाईल्ड हेल्थ डॉ. मॅक्स डेव्ह म्हणतात, दोन वर्षांपेक्षा जास्त वयाच्या बालकांना स्तनपान दिल्याने त्यांच्या आरोग्याला अधिक लाभ होत असल्याचे फारसे पुरावे नाहीत.
काहीही धोका नाही
आपल्या बाळाला स्तनपान देणं सुरू ठेवावं की बंद कराव, हा विषय अनेक बाबींशी निगडित आहे, असं तज्ज्ञांना वाटतं. कामावर परत रुजू होणे, मित्रमैत्रिणींचा आणि कुटुंबाचा पाठिंबा, तसंच आत्मविश्वासाने स्तनपान देणं अशा अनेक गोष्टींचा त्यात समावेश होतो. स्तनपान ही अतिशय वैयक्तिक बाब आहे, असं डॉ. डेव सांगतात. “स्तनपानामुळे आई आणि मुलामधलं नातं दृढ होतं आणि त्यानी काहीच धोका होत नाही. त्यामुळे जे सोयीचं आहे त्यानुसार कुटुंबाने निर्णय घ्यावा,” असं ते म्हणाले. पण परिस्थिती अशी आहे की यूकेमध्ये 80 टक्के स्त्रिया बाळांना स्तनपान देतात. पण यातील बऱ्याच महिला बाळाच्या जन्मानंतर काही आठवडयांतच स्तनपान देणं बंद करतात. मूल सहा महिन्याचं झाल्यावर फक्त एक तृतीयांश बालकांना आईचं दूध मिळतं आणि एक वर्षांचं झाल्यावर हे प्रमाण 0.5% इतक कमी येतं. 2016 साली प्रकाशित झालेल्या एक अहवालानुसार जागतिक पातळीवर यूकेत स्तनपानाचा दर सर्वांत कमी आहे. बालआरोग्य तज्ज्ञांच्या मते स्त्रियांना स्तनपान सुरू केल्यानंतर काही काळ त्रास होऊ शकतो पण त्यांना नेहमीच योग्य सल्ला मिळतोच असं नाही. काही स्त्रिया स्तनपान देऊ शकत नाहीत, तर काही देऊ शकतात. या दोन्ही प्रकरणांमध्ये त्यांचा आदर करायला हवा, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
![]() | ReplyForward |