देश-विदेश

फेसबुक भाजपचे मुखपत्र – पवन खेडा

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २५ — 

फेसबुक हे समाज माध्यम भारतीय जनता पक्षाचे मुखपत्र झाले आहे असा आरोप कांग्रेसचे  प्रवक्ते पवन खेडा यांनी  पत्रकार परिषदेत केला . ही पत्रकार परिषद आज दुपारी कांग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथे झाली .  भारतात फेसबुक या सामाजिक माध्यमाचे ३७ कोटीपेक्षा जास्त ग्राहक आहेत .

या सामाजिक माध्यमावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा असलेले बजरंग दल देशात दोन गटात द्वेष वाढावा आणि तणाव निर्माण व्हावा अशी माहिती देण्याचे काम करत आहे . ही माहिती हटवली जात नाही . शिवाय फेसबुक देशातील निवडणुकांमध्ये भाजपला फायदा होईल असे पाऊल उचलत आहे .

या आमच्या आरोपाची चौकशी करण्यासाठी संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्याचा समावेश असलेली संयुक्त संसदीय समिती स्थापन करून चौकशी केली जावी अशी मागणी आज कांग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनी केली .     मे २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हाती घेतली . तेंव्हापासून फेसबुक भाजपला पोषक अशी भूमिका घेत आहे .

आता फेसबुक हे फेकन्युज ( बनावट बातम्या ) पसरवणारे माध्यम झाल्याचा आरोप कांग्रेसने केला . फेसबुकवर हिंसक मोहिमांना खतपाणी घालणारे फोटो तसेच  माहिती असते . यापैकी केवळ ० दशांश २ टक्के माहिती काढून टाकली जाते . मात्र उर्वरित माहिती / फोटो आहे त्या स्थितीत असतात . यामुळे देशात हिसंक घटना घडण्यास वातावरण निर्मिती होते असा आरोप कांग्रेस पक्षाने केला .

फेसबुकने स्वतः एक पाहणी /निरीक्षण केले . यात बजरंग दल देशासाठी धोकादायक संस्था आहे असा सार त्यातून पुढे आला . बजरंग दल देशासाठी धोकादायक संस्था आहे अशी सार्वजनिक घोषणा फेसबुक करण्याच्या तयारीत असल्याचे समजले होते . मात्र त्यांनी भारतीय जनता पक्षाला हे रुचणार नाही म्ह्णून एक पाऊल मागे घेतल्याचे समजले असे पवन खेडा म्हणाले .    

हिंदी आणि बंगाली जाणकार लोक फेसबुक मध्ये मोठ्या प्रमाणात नाहीत . त्यांनी या भाषा जाणकारांची नियुक्ती करणे आवश्यक आहे . मात्र ते हिंदी आणि बंगाली भाषा जाणकार लोक नियुक्त करण्याचे टाळत आहेत . भारतामध्ये फेसबुक हे भारतीय जनता पक्षाचे मुखपत्र बनले आहे असा  आरोप  कांग्रेस पक्षाने केला . केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे .

या सरकारने ट्विटर वर मोठ्या चपळतेने कारवाई केली होती . मात्र हे सरकार फेसबुकवर कारवाई करत नाही . कारण भाजपला अनुकूल भूमिका फेसबुक घेत आहे .    भारतीय लोकशाही प्रकियेत फेसबुक नाकखूपसत आहे . फेसबुक निवडणूक प्रक्रिया मध्ये हस्तक्षेप करत आहे . यामुळे या सामाजिक माध्यमाच्या व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समिती मार्फत चौकशी केली जावी अशी मागणी पवन खेडा यांनी आज केली . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment