विचार समाजकारण

बसंती नो डान्स, इन फ्रंट ऑफ दीज डॉग्स……

रोहन सुनंदा मधुकर भेंडे

काही समाजाला उपदेश देणारा साहित्य हाती आलं कि त्यावर मतप्रदर्शन करण्याचा मोह आवरत नाही. काल सुपर ३० पाहिला . सिनेमा पाहण्याचा मुळातच गंध नसल्यामुळे, नुसताच जाऊन बसलो.

परंतु संपल्यावर अश्रुने डोळे ओले घेऊनच बाहेर पडलो. असो. या सिनेमाला ४ भागात वर्गीकरण केल्यास कदाचित त्याला न्याय दिल्यासारखं होईल. खरा आनंद कुमार – देशाच्या आपल्या स्वातंत्रोत्तर इतिहासातली पहिली वीस-बावीस वर्ष सोडली तर समाजकारणाचा विचार करणारे नेते थोडे. लालू बिहारचे. बरच वाचलं त्यांच्याबाबत. तिथल्या अनेक गाव शहरात जाऊन त्यांच्याबाबत बोललो.

लोकांच्या मनात जागा आहे त्यांचा करीता. गरीबी असलेल्या घरात ती जागा देवळात पण होती. आनंद कुमार सुद्धा त्याच राज्याचं नेतृत्व करतो. हा समाज, हि जातीव्यवस्था नामक लागलेली कीड आणि आर्थिक निकष, यामुळे हजारो विद्यार्थी वर्षानुवर्षे अशीच प्रतिभा हरवून बसलेली. आनंद कुमार त्यातील एक. पहिला क्रमांक येऊन गोल्ड मेडल ने (सुवर्ण पदक) आनंदी न होता दुसऱ्या क्रमांकाला मिळालेल्या पुरस्काररूपी आंतराष्ट्रीय नियतकालिकाच्या (इंटरनॅशनल जर्नल ) मोहात पडणारा.

वाचनालयाच्या कपाटावर असलेली पुस्तके वाचायला मिळावीत म्हणून गावातून पटना रेल्वे च्या टपावर बसून जाणारा. पण यात एक सामाजिक प्रश्न दडलेला आहे. का होत असावं असं. समाज आणि अर्थव्यवस्थेचा नातं काठीच्या दोन टोकासारखं भासतंय ते बघितला कि.

इतक्या कष्टी आयुष्यात गणिताची गती असणारा तो विद्यार्थी विदेशातील विद्यापीठांना प्रतिभावान वाटावा आणि त्याच विद्यार्थ्याला विदेशात टपाल पाठवण्यासाठी अवघ्या २५० रुपयाला जमा करण्याची वेळ यावी. दारिद्र्य नेहमीच माणसांना श्रीमंतपणा शिकवतो मनाचा. आनंद असाच मनानी श्रीमंती असलेला. परंतु त्याच्या प्रतिभेला त्यावेळी जागा मिळावी अशी एक सुद्धा व्यवस्था या समाजात उभी न राहावी हि शोकांतिका. आणि अश्यातच तो त्याच्या केम्ब्रिज विद्यापीठात जाण्याच्या स्वप्नाला बापाच्या देहासोबत अग्नी देऊन शांत झाला. स्वतःच्या मुलाच्या प्रतिभेची जाणीव असलेला बाप स्वतःच्या जगण्याचं स्वार्थ विसरून कसा आयुष्य खपवतो मुलांच्या भल्यासाठी याच ते जिवंत उदाहरण .

आर्थिक सुबत्ततेची पहिली १० मिनिट. संघर्षात होरपळून निघालेला आनंद धनाढ्यांच्या हाती सापडल्यावर त्याचा काय होतो याची ती जिवंत प्रतिकृती. श्रीमंतांच्या मुलांना १० लाख रुपये घेऊन शिकवण्याचे आश्वासन देणारा आनंद कुमार त्याच वेळी गरीब आलेल्या विद्यार्थाना इथे जागा नाही असे सुनावताना काळजात चर्रर्र होतं .

आणि हे सिनेमा मध्ये दाखवला म्हणून नाही, तर सत्यात हाच प्रकार सुरु आहे सगळीकडे. गल्लोगल्ली अश्याच आनंद कुमारांचा बोलबाला झाला आणि त्यांच्या जीवावर उडणाऱ्या शिकवणी संचालकांचा. आनंद कुमार ला वयक्तिक ओळखतो त्यामुळे हि टीका त्याच्यावर नाहीच.

हि आहे त्या सगळ्यावर, ज्यांनी संघर्ष करून प्रतिभा प्राप्त केली. आणि नंतर गळ्यात घातलेली सोन्याची साखळी काढण्याची हिम्मत झाली नाही. आणि गरिबांची प्रतिभा तिथेच होरपळत राहिली. सुपर ३०… आनंद नि जी संकल्पना मनात ठरवली आणि सत्यात उतरविली हि पण अनन्यसाधारण अशी म्हणावी बाब. आंबेडकर म्हणले होते एकदा “जो मनुष्य मरायला तयार होतो तो कधीच मरत नाही, आणि जो मरायला भितो तो आधीच मेलेला असतो.”

याच न्यायांनी हे सुपर ३० वाचायला हवेत. सिनेमाच्या काही घटना रंगवून दाखवण्याची गरज असावी परंतु सत्यात पण असाच संघर्ष असतो गरिबांच्या जगण्यात. घरात भरभराट असून सुद्धा भिकाऱ्याला भीक न देणारी जमात या संघर्षापासून अनभिज्ञ. उपास करायचा असतो अशी त्यांची धारणा, उपास घडत असतात हे सत्य त्यांच्या गावी नाही. मुलांचा संघर्ष, समजून घेण्याची त्यांची बुद्धिमत्ता आणि त्यानंतर ज्ञानार्जन करण्याची धडपड हे वास्तव आहे. रस्त्याच्या कडेला असणाऱ्या दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून यश प्राप्त करणाऱ्यांचा देशचं आहे आपला. दुर्दैव इतकंच कि त्या सर्व महान लोकांच्या पुण्यतिथ्या जयंत्या मानवण्यातच आपलं मोठेपण.

इतका मोठा विद्यार्थ्यांचा संघर्ष अखेर त्या श्रीमंतांच्या जगात पुन्हा एकदा पराभूत होतो हे पाहताना कुणाला काय वाटलं असेल त्या चित्रपटगृहात. असो.. ती लढली, जिंकली आणि आनंद कुमार ला नवीन उमेद देऊन गेली. कदाचित मुले हरली असती तर आनंद चा संघर्ष तिथेच संपला असता. आणि दरवर्षी यश प्राप्त करणारी सुपर ३० जन्माला आली नसती.

म्हणून त्या संघर्षाला सलाम करावाच वाटतो. सुपर ३० आणि समाज या जगात गरिबी खूप जास्त भावात विकल्या जाते. हे भयाण आणि दुर्दैवी असला तरी वास्तव आहे. दरवर्षी कादंबऱ्या, सिनेमे, नाटक यात पुरस्कार कुणाला प्राप्त होतो, तो होतो समाजाच्या दुखऱ्या बाजू मांडणाऱ्या कलाकृतींना. परंतु त्या कलाकृती पाहून समाज विचार करतो का. कदाचीत अजिबात नाही.

ज्या सुपर ३० तील मुलांचा संघर्ष पाहून पालकांना काही मिनिट गलबलायला होतं त्यातील किती थेटर बाहेर पडल्यावर त्यावर विचार करतात. त्याच थेटर मध्ये ६०० रुपयाला मिळणारी कॉफी चा घोट घेऊन सुपर ३० ची चर्चा निरर्थक आहे. स्वतःच्या भाषेचा इंग्रजी शी चाललेला संघर्ष आणि त्यांनी घाबरलेली मुले, यांचा जिंकण्याचा संवाद रेखांकित करताना दिग्दर्शकाने वापरलेली संस्कृत श्लोक काय आणि कशी समजून घ्यावी. ती हिंदी का नाही लिहिता अली कुठल्याही संवाद लेखकाला.

कारण हि समाजव्यवस्था आहे तशी जोपासण्यातच अर्थव्यवस्थेचा भलं आहे. या समाजाला बळ देणारी काही हरहुन्नरी आनंद कुमार, सुधा मुर्ती, टाटा जिवंत आहे तो पर्यंत काही बदलायला हवं अन्यथा “बसंती नो डान्स, इन फ्रंट ऑफ दीज डॉग्स……

” हा सिनेमाचा संवाद होऊन राहील आणि समाज निपचित पडलेला असेल कदाचित.

About the author

संपादकीय

Leave a Reply

Leave a Comment