महाराष्ट्र

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना खुळेखुळे भेट

पुणे-भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेशाध्यक्षाचा पदभार स्वीकारताच, महाविकास आघाडी वरती सडकून टीका सुरू केली आहे. सोबतच भाजपची सत्ता महाराष्ट्रात टिकवण्यासाठी त्यांचे अतोनात प्रयत्न सुरू आहेत. मात्र तसचे महाविकास आघाडीच्या नेत्यावर सडकून टीका करत आहे , म्हणून या दिवाळी निमित्त चंद्रशेखर बावनकुळे याना काँग्रेसचे युवक अध्यक्ष रोहन सुरवसे यांनी दिवाळी भेट म्हणून खूळखुळे देण्यात आले आहेत. पोस्टाने त्यांच्या निवासस्थानी भेट देण्यात येणार आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, यांनी पदभार स्वीकारतात मविआवर सडकून टीका सुरू केली आहे. बावनकुळे हे प्रत्येक कार्यक्रमाला वेगवेळगे विधान करत आहेत. साकोल्यात काँग्रेसचा पंजा थांबवायचा आहे, बारामती मध्ये राष्ट्रवादीच घड्याळ बंद पाडायचं, आणि वरळी मध्ये समुद्राच्या पाण्याने मशाल विजवायचे. त्याचसोबत २०२४ ला बारामतीत घड्याळ बंद पाडायचे अशे अनेक विधान ते करत आहेत. मात्र ते विधान करणं सोपं असत पण करून दाखवणं वेगळं असात असे म्हणत रोहन सुरवसे यांनी या दिवाळीला भेट म्हणून खूळखुळे दिली आहे

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment