
सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती
कोंकण-आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील घरावर झालेल्या हल्ल्याचे पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलीस करत आहेत.
दरम्यान भास्कर जाधवांनीच हे स्वतःला प्रसिद्धी मिळावी सुरक्षा मिळावी यासाठी हे षड्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप भाजपचे परिमल भोसले यांच्याकडुन करण्यात आला आहे. पोलिसांनी वाय प्लस सुरक्षा काढण्यात आल्याचे पत्र भास्कर जाधव यांना मंगळवारी रात्री देण्यात आले त्यानंतरच काहीवेळात हा हल्ला झाला आहे त्यामुळे या सगळ्याची गंभीर दखल पोलिसांकडून घेण्यात आली आहे.
गाडीच्या काचा फोडणे, घराच्या काचा फोडणे याला भ्याड हल्ला म्हणतात यांच्या हे सगळ केवळ षड्यंत्र आहे. त्यांच्या अंगण्यात केवळ स्टँम्प व रिकामी बॉटल मिळाली याला भ्याड हल्ला म्हणत नाहीत हा सगळा भास्कर जाधवांनीच रचलेला कट असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.