कोंकण – मंगळवारी रात्री चिपळूण शहरातील पाग भागातील आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. अज्ञातांचा शोध घेण्यासाठी चिपळूण पोलिसांनी आता परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केले असून आठ संशयितांचे जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तपासासाठी आणलेले डॉग स्कॉड ही अवघ्या पन्नास मीटर वर जाऊन थांबल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जाधव यांच्या घरापासून काही अंतरावर असणाऱ्या पाग येथील दोन ठिकाणी असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत आरोपींच्या शोध घेण्यासाठी हे फुटेज उपयोगी पडण्याची शक्यता पोलिस सूत्रांकडून व्यक्त होत आहे. तसेच आज चिपळूण पोलिसांनी आमदार भास्कर जाधव यांच्या कुटुंबियांचे जबाब देखील नोंदवले असल्याची माहिती पुढे येत आहे.त्याच बरोबर आठ संशियातांचे जबाब घेण्यात आले तर सी डि यार मागविण्यात आले आहेत त्याचबरोबर परिसरातील पेट्रोल पंप ,हॉटेल याठिकाणचे सी सी टी व्ही फुटेज ताब्यात घेऊन तपास करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणाचा छडा लवकच लागणार असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.