देश-विदेश

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकरला काही कळत नाही — राणे

नारायण राणे आणि अमित शाह यांची आज भेट

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकरला काही कळत नाही — राणे 

नवी दिल्ली ता ७ —  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उद्या ( तारीख ८ सप्टेंबर )  दुपारी साडेबारानंतर केंद्रीय सूक्ष ,लघु आणि मध्यम विभागाचे मंत्री नारायण राणे  भेटणार आहेत . या भेटी प्रसंगी जन – आशीर्वाद यात्रे प्रसंगी झालेल्या अटकेचा अहवाल राणे हे अमित शाह यांना देणार आहेत असे समजते .    

उद्या सकाळी ११ वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे . ही बैठक संपल्यानंतर राणे हे अमित शाह यांना  भेटणार आहेत . या प्रसंगी ते आपला अहवाल शाह यांना देतील . या अहवालाकडे महाराष्ट्र सरकारचे लक्ष आहे .    मराठा आरक्षणाबाबत छत्रपती संभाजी राजे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली .

राष्ट्रपती कोविंद यांनी यात हस्तक्षेप करावा अशी मागणी शिष्टमंडळाने गेल्या आठवड्यात केली . या शिष्टमंडळात छत्रपती संभाजी राजे , शिवसेनेचे खासदार विनायक राऊत ,कांग्रेसचे आमदार संग्राम थोपटे ,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण आणि भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक -निबांळ्कर होते . मराठा आरक्षणाबाबत या शिष्टमंडळाला  कांही कळत नाही असे राणे म्हणाले . 

आपल्या देशात नागालॅन्ड मध्ये ८० टक्के आरक्षण , छत्तीसगढ मध्ये ८२ टक्के आरक्षण ,मीझोराम राज्यात ८० टक्के आरक्षण ,मध्ये प्रदेशात ७३ टक्के आरक्षण आणि तमिळनाडू राज्यात ६९ टक्के आरक्षण ही मर्यादा आहे . हे लक्ष्यात घेऊन महाराष्ट्रात ५० टक्क्याच्या वर आरक्षण न्या अशी मागणी बहुतेक नेते करत आहेत . यात छगन भुजबळ आणि रामदास आठवले यांचा  ही समावेश आहे .     देशातील अन्य राज्यात ५० टक्क्याच्या पुढे आरक्षण देण्यात आले आहे . यामुळे महाराष्ट्रात देखील मराठा समाजाला आरक्षण देता येते . हे आरक्षण राज्यघटना कलम १३(४) आणि १४(४) अन्वये देता येते असे राणे यांचे मत आहे .    
 कर्नाटकातील बेळगाव येथील महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाचा विजय झाला . तेथे शिवसेना आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचा पराभव झाला . हे पाहता आता आगामी मुंबई महानगर पालिकेत देखील शिवसेनेचा पराभव होईल . मुंबई महानगर पालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येईल असे राणे म्हणाले . बेळगावच्या विजयाची पुनरावृति मुंबई महानगर पालिकेत होईल असा दावा राणे यांनी केला . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment