देश-विदेश महाराष्ट्र

मराठा आरक्षणावर पुढची दिशा काय कळवेन – राष्ट्रपती रामनाथ कोविंद

निवेदनावर सही करण्यावर भाजप -शिवसेनेत संभ्रम 
मराठा आरक्षणासाठी व्याख्या बदला — छत्रपती संभाजी राजे 

मराठा आरक्षणप्रश्नी राष्ट्रपती महोदयांच्या भेटीसाठी निघण्यापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी खासदार वंदनाताई चव्हाण, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार विनायक राऊत व आमदार संग्राम थोपटे या सर्वपक्षीय प्रतिनिधींसह त्यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी याविषयी सविस्तर चर्चा.

कमलेश गायकवाड नवी दिल्ली

मी आपले म्हणणे ऐकूण  घेतले आहे . मी आता मराठा आरक्षणावर अभ्यास करेन आणि नंतर पुढे काय दिशा असेल ते कळवेन असे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आम्हाला कळवले आहे अशी माहिती राज्यसभा खासदार आणि शिष्टमंडळाचे नेतृत्व करणारे छत्रपती संभाजी राजे यांनी आज दिली .      

छत्रपती संभाजी राजे यांनी भाजप , कांग्रेस ,शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या सदस्यांसोबत आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली . ही भेट सव्वा पाच ते पावणे सहा वाजताच्या दरम्यान राष्ट्रपती भवनात झाली . राष्ट्रपती नामनियुक्त राज्यसभा खासदार छत्रपती संभाजी राजे , भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक -निबांळ्कर , कांग्रेसचे आमदार संग्राम थोपटे ,राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या खासदार वंदना चव्हाण ,शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांचा शिष्टमंडळात समावेश होता .

या शिष्टमंडळाने एक निवेदन रामनाथ कोविंद यांना दिले . मराठा आरक्षण हा मुद्दा महाराष्ट्र राज्यापुरता मर्यादित आहे  . मात्र निवेदनात  देशभराची समस्या ध्वनित आहे . गुजरातमध्ये पटेल , हरयाणात जाट ,राजस्थानात गुजर समाज आरक्षण मागत आहे . मराठा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्याचा निर्णय झाला तर इतर समाजाचा मार्ग सुकर होईल असे पाऊल संभाजी राजे यांनी टाकले . 


   करवीर संस्थांनचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी १९०२ मध्ये अनुसूचित जाती (एस सी ) ,अनुसूचित जमाती (एस टी ) ,अन्य मागास वर्ग (ओबीसी ) आणि मराठा समाजाला प्रथम आरक्षण दिले . हा मुद्दा आम्ही कोविंद यांना समजावून सांगितला . मराठा समाजाला १९३७ पर्यंत आरक्षण मिळत होते . मात्र त्यानंतर आरक्षण मिळणे बंद झाले . इंदिरा सहानी निवाड्यानुसार आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्याच्या वर नेता येत नाही . हा निवाडा १९९२ चा आहे . त्यानंतर भौगोलिक स्थितीत खूप बदल झाले .

दूरवरच्या गावात रस्ते पोचले . यामुळे आरक्षण देण्यासाठी जी व्याख्या ( अतिमागास भाग )करून ठेवण्यात आली आहे . त्यात बदल करावा लागेल . प्रथम मराठा समाज मागास आहे . हे ठरवावे लागेल मग आरक्षण मिळेल . त्यासोबतच कायद्यात बदल करावे लागतील . त्यासाठी आम्हीं प्रयत्न करत आहोत असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले .    

धनगर आणि धनगड या विषयावर देखील वाद आहे . महाराष्ट्रात धनगर ही  जात आहे . उत्तर भारतात धनगड असा  शब्द प्रयोग होतो . हिंदीला इंग्रजीत लिहिणे , इंग्रजी स्पेलींग मुळे हा घोळ झाला आहे . त्यात सुधारणा करावी अशी मागणी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती कोविंद यांच्याकडे केली . मात्र हाच मुद्दा रणजितसिंह नाईक -निबांळ्कर यांनी पत्रकार परिषदेत मांडला . निबांळ्कर यांनी राष्ट्रपतीकडे धनगर आरक्षण हा मुद्दा मांडला नाही असे समजले .    

चार पक्षाचे सदस्य कोविंद यांना भेटायला गेले . मात्र दिलेल्या निवेदनावर स्वाक्षरीचा मुद्दा समोर आला . स्वाक्षरीच्या पाठीमागे बरेच राजकारण घडले . भाजपचे खासदार निबांळ्कर यांनी निवेदनावर खूप उशीरा सही केली . विनायक राऊत यांना त्यांच्या वरिष्ठांनी सल्ला दिल्यावर निवेदनावर सही केली  .

निवेदनावर सही करण्यावरून बरीच खलबत भाजप – शिवसेनेत झाल्याचे समजले . भाजप मराठा समाजाला आरक्षण देण्यावर ठाम आहे असे निबांळ्कर म्हणाले .   गायकवाड आयोगात कांही उणिवा होत्या . भोसले समितीने १२ मुद्दे पुढे केले आहेत . त्यावर पुढे जायला पाहिजे . मात्र पहिले पाऊल राज्यसरकारने उचलणे गरजेचे आहे असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment