प्रज्ञा सातव यांना उमेदवारीची शक्यता
नवी दिल्ली , ९ :
महाराष्ट्रात राज्यसभेची एक जागा रिक्त आहे . कांग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतला . त्यानुसार त्यांनी आज निवडणुकीची घोषणा केली . महाराष्ट्र राज्याबरोबर अन्य राज्यात देखील राज्यसभेसाठी निवडणूक होणार आहे . महाराष्ट्रातील एका जागेसाठी निवडणूक होणार आहे . आगामी ४ ऑक्टोबर रोजी मतदान होईल. त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर असल्याचे निवडणूक आयोगाने कळवले आहे .
राजीव सातव यांची पत्नी प्रज्ञा सातव यांना कांग्रेस पक्ष उमेदवारी देण्याची शक्यता आहे .
भारत निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासह, पश्चिम बंगाल,आसाम, मध्यप्रदेश आणि तामीळनाडूमधून राज्यसभेवर रिक्त झालेल्या एकूण सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला .
खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे १६ मे २०२१ पासून महाराष्ट्रातून राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. या जागेसह राज्यसभेच्या एकूण सहा जागांसाठी ४ ऑक्टोबर २०२१ ला निवडणूक घेण्यात येणार असून याच दिवशी निकाल जाहीर होणार आहे.
या निवडणुकांसाठी १५ सप्टेंबर रोजी निवडणूक अधिसूचना जारी होणार आहे. २२ सप्टेंबर अर्ज करण्याची अंतिम तारिख असून २३ सप्टेंबर रोजी अर्जांची छाननी होणार. २७ सप्टेंबर पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. ४ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मदतदान होणार असून सायंकाळी ५ वाजता मतमोजणी होवून निकाल जाहीर होणार आहे. ६ ऑक्टोबर २०२१ रोजी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपणार आहे .