राजकारण

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पदाधिकारी यादीवर लवकरच कात्री

कांग्रेस पदाधिकारी यादीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची घुसखोरी

नवी दिल्ली ता २० — महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस पदाधिकाऱ्यांची यादी केंद्रीय पातळीवरून अलीकडेच जाहीर करण्यात आली . त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांचा समावेश करण्यात आला आहे . यामुळे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी देखील आश्चर्य व्यक्त केले आहे . ती नाव वगळली जावीत असे नाना पटोले यांनी म्हटल्याचे समजले .    

पुण्यातील अजित आपटे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आहेत . त्यांना कांग्रेस पक्षाने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे सरचिटणीस केले आहे . अजित आपटे सारखे अनेक नेते कांग्रेसच्या यादीत आहेत . आता नव्याने सदस्यांची शहानिशा केली जात आहे असे कळले . कांग्रेस पक्षाने श्रीमती देवकर यांना एका आयोगाचे सदस्य केले होते . त्यांच्या माध्यमातून या नियुक्त्या झाल्याचे समजते .

पुण्याच्या  कांग्रेस नेत्या  श्रीमती चौधरी यांच्या संपर्कातील राष्ट्रीय स्वयंसवेक संघाचे सदस्य कांग्रेस पक्षात पदाधिकारी  झाले आहेत . संबंधित नेते हे कांग्रेस पक्षाचे प्राथमिक सदस्य ही नाहीत . शिवाय त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश देखील केलेला नाही अशी माहिती एका कांग्रेस नेत्याने दिली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित नेत्यांना तातडीने वगळले जावी असे नाना पटोले यांनी कांग्रेस पक्ष श्रेष्ठीला  कळवले आहे असे कळले  .    

कांग्रेसने नव्याने जे पदाधिकारी केले आहेत . त्यात सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि कांग्रेसचे केंद्रीय सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे मोठे वर्चस्व आहे असे समजले . कांग्रेस पदाधिकारी यादीवर लवकरच कात्री लावली जाईल असे कळते .  

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment