महाराष्ट्र राजकारण

महिला राज्यपालांची संख्या वाढणार — भाजप

महाराष्ट्रातून शोभा फडणवीस आणि कांता नलावडे यांची नावे चर्चेत  

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता ४ —

पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच मोठ्या प्रमाणात महिलांना राज्यपाल करणार आहेत असे समजले . महाराष्ट्रातून माजी मंत्री शोभा फडणवीस आणि माजी आमदार कांता नलावडे या राज्यपाल होणार आहेत असे भारतीय जनता पक्षातील सदस्याने खासगीत बोलताना सांगितले .  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शोभा फडणवीस या नातलग आहेत . शोभा फडणवीस यांच्या  एका नातवाने वय नसताना कोरोना लस घेतल्याने मोठ्या प्रमाणात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात राजकीय दृष्ट्या टीका करण्यात आली होती . महिला मोर्चाच्या राष्ट्रीय माजी अध्यक्षा  राहिलेल्या कांता नलावडे या देखील राज्यपाल होण्यास उत्सुक आहेत . त्यांनी अलीकडेच दिल्ली भेटी दरम्यान अनेक राजकीय नेत्यांना भेटून राज्यपाल पदा बाबत चर्चा केलेली आहे .

माझ्या आधी शोभा फडणवीस यांना केवळ देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे लवकर राज्यपाल म्हणून संधी मिळेल की काय असे त्यांना मनातून वाटत असल्याचे त्यांच्या जवळच्या एका भाजप सदस्याने खासगी गप्पामध्ये सांगितले . कांता नलावडे यांनी राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एका वेळी बारामती लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवली होती . मात्र त्यात कांता नलावडे यांचा पराभव झाला होता .      

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यन्त महाराष्ट्रातील राम नाईक ,बनवारीलाल पुरोहित आणि नजमा हेपतुल्ला यांना राज्यपाल होण्याची संधी दिलेली आहे . प्रकाश जावडेकर यांना राज्यपाल केले जावे अशी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची इच्छा असल्याचे कळले . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment