महाराष्ट्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडा – शिवसेना

देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होऊ न देणे स्वकीयांचे षडयंत्र

रभणी ,रत्नागिरी ,नाशिक  ,शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांच्यात संघर्ष 

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता ३० —  

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार पाडा . हे राज्य सरकार केवळ २ – ४ लोकांसाठी चालले आहे असे शिवसेनेचे आमदार आम्हाला खासगीत सांगत आहेत . शिवसेनेचे किमान २० आमदार फुटून भाजपकडे येणार आहेत . मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे पी नड्डा यास सहमती देत नाहीत असे भाजपच्या एका आमदाराने खासगीत बोलताना म्हटले .    

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारला २८ नोव्हेंबर २०२१ रोजी २ वर्ष पूर्ण होतील . भारतीय जनता पक्षाने ठाकरे सरकार ५ आठवड्यात २ महिन्यात पाडू / पडेल असे म्हटले . केंद्रातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे आणि केंद्रातील सामाजिक न्याय आणि अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सरकार पडण्यासाठी अनेक काल मर्यादा सांगितल्या मात्र ते अद्याप खरे झाले नाही .    

एका पक्षाचे सरकार असताना वाद होतो . आता तर ३ पक्षाचे सरकार आहे . हा वाद होणार आहे . राजकारणात हा वाद नवीन नाही असे कांग्रेसचे नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटलेले आहे  . बाळासाहेब थोरात यांनी सध्याचा सुमारे  ३ वर्षांचा कालावधी पूर्ण करून पुढील ५ वर्ष देखील ३ पक्षाचे सरकार असेल असे विधान  केलेले आहे .    

राज्यातील परभणी ,रत्नागिरी आणि नाशिक जिल्ह्यात थेट शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांच्यातील वाद मोठया प्रमाणात चव्हाट्यावर आला आहे . परभणीतील शिवसेनेचे खासदार संजय जाधव , रत्नागिरीतील शिवसेनेचे  माजी खासदार अनंत गीते आणि नाशिक मधील राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे . स्थानिक स्वराज्य संस्था खेड मध्ये देखील शिवसेना आणि राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष यांच्यातील वाद हा देखील राज्याने पाहिला आहे.    

आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला राज्यातील ४८ पैकी किमान ३० – ३२ जागा हव्या असतील तर राज्यातील सरकार पाडून शिवसेना – भाजपचे सरकार राज्यात आणावे लागेल असे भाजपच्या एका आमदाराने म्हटले .  

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूक २०१९ च्या आधी कांग्रेस ,राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि अन्य पक्षातील इतर नेत्यांना भाजपमध्ये घेतले . त्यामुळे संबंधित पक्षाला देवेंद्र फडणवीस राजकीय धोका वाटू लागला . त्यांचे मनोबल तोडण्यासाठी स्वपक्षीय आणि बाह्य पक्षातील नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री होण्यात अडचण निर्माण केली . ही अडचण म्हणजे नियोजित षडयंत्र आहे .

दिल्लीकरांना देवेंद्र फडणवीस म्हणून मुख्यमंत्री नको आहेत . कारण ते तातडीने दिल्लीकडे झेप घेतील अशी भीती दिल्लीतील भाजपला आहे असे फडणवीस यांच्या जवळच्या आमदाराने खासगीत आपले विचार मांडले . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment