मराठवाडा

मुलीच्या लग्नासाठी जमा केलेल्या पैशांवर चोरांचा डल्ला

जालना-जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील धाकलगाव येथे मुलीच्या लग्नासाठी घरात ठेवलेले २ तोळे सोने,मुलीच्या लग्नासाठी खरेदी करण्यात आलेल्या साडया,दागिने व रोख रक्कम ८५ हजारांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे.

घरमालकाला जाग आल्यानंतर घरात चोरी झाल्याची घटना उघडकीस आली.लग्नघटिका तोंडावर असताना घडलेल्या या घटनेमुळे आता हे शुभकार्य कसे पार पाडावे अश्या काळजीचे सावट पसरले आहे. अंबड तालुक्यातील धाकलगाव येथील सलीम मन्सूर पठाण यांनी मुलीच्या लग्नासाठी घरात पैसे,सोने, साडया,वस्तू आणून ठेवल्या होत्या.ज्या खोलीमध्ये पैसे, दागिने,साड्या ठेवण्यात आल्या होत्या त्या खोली मध्येच शेतातील कापूसही आणुन टाकल्याने त्या खोलीला बाहेरून कुलूप लावुन सर्व कुटुंबीय शेजारच्या खोलीत झोपलेले होते.ज्या खोलीमध्ये सलीम पठाण यांचे कुटुंबीय झोपले होते,त्या खोलीच्या बाहेरून व शेजाऱ्यांच्या घरालाही चोरट्यांनी कडया लावून ही चोरी केली.

सलीम पठाण यांना सकाळी खोलीचा दरवाजा उघडण्यासाठी प्रयत्न केला असता बाहेरून दरवाज्याला कडया लावल्याचे त्यांच्या लक्षात आले.त्यांनी घराशेजारी असलेल्या नातेवाईकांना माहिती दिल्यानंतर नातेवाईक घरातील जिन्यातुन घराच्या छतावर खाली उतरले व बाहेरून लावलेल्या कड्या उघडल्या तेंव्हा घरापुढे घरातील सामानाची चोरी झाल्याचे समोर आले. पोलिसात याबाबत खबर देण्यात आली असून तपास सुरु आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment