नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केले आहे. सोमय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली.
किरीट सोमय्या यांच्याकडून राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार
नवी दिल्ली : भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी राज्याचे ग्रामीण विकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यानंतर, सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना लक्ष्य केले आहे. सोमय्या यांनी शुक्रवारी दिल्लीत नांगरे-पाटील यांच्याविरोधात राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल केली.
सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करत असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला. मी कोल्हापूरला निघालो असताना मला नांगरे पाटील यांनी बेकायदा घरात कोंडले होते, अशी तक्रार सोमय्या यांनी केली आहे.
सोमय्या यांना उच्च न्यायालयाचे समन्स
मुंबई : खोटे आरोपप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दाखल केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या दाव्यात उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांना समन्स बजावत २३ डिसेंबरला व्यक्तिशा: न्यायालयात हजर राहण्याचे वा त्यांच्या वकिलास उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.