राजकारण

मोदी सरकारच्या धोरणाविरुद्ध कांग्रेसचे पुढच्या महिन्यात आंदोलन

एस सी  ,एस टी आणि ओबीसी समुदायला जवळ करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न 

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २६ —

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र स्वीकारून ७ वर्षापेक्षा जास्त कालावधी उलटला . या काळात त्यांनी राबवलेल्या आर्थिक धोरणामुळे केवळ ठराविक उद्योगपतींचे भले झाले . सूक्ष्म ,लघु आणि मध्यम उद्योगाच्या पाठीचा कणा मोडला . पर्यायाने देशात महागाई वाढली . देशात सामाजिक न्याय मिळणे कठीण झाले आहे . समानतेकडे दुर्लक्ष्य केले जात आहे . यावर काँग्रेस पक्ष १४ नोहेंबर ते २९ नोव्हेंबर या काळात जण जागरण अभियान राबवणार आहे असे कांग्रेस प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला म्हणाले  .          

भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पक्ष येत्या १ नोव्हेंबर पासून ते ३१ मार्च २०२२ पर्यंत सदस्यता अभियान राबवणार आहे . यामध्ये १८ वर्ष वयाच्या तरुण ,तरुणीला सदस्य बनवून घेतले जाणार आहे . अगदी खालची पातळी म्हणजे गल्लीत जाऊन सदस्यता मोहीम राबवली जाणार आहे . यावर विशेष भर दिला जाणार आहे . कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आज कांग्रेस मुख्यालय २४ अकबर रोड येथे अखिल भारतीय कांग्रेस समितीचे सदस्य ,राज्याचे प्रभारी ,देशातील प्रदेश अध्यक्ष आदींची बैठक झाली .

या बैठकीत सदस्यता अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती कांग्रेस संवाद विभागाचे प्रभारी आणि प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी दिली . काँग्रेस पक्षाने आतापर्यंत अनुसूचित जाती (एस सी ) ,अनुसूचित जमाती ( एस टी ) , अन्य मागासवर्गीय ( ओबीसी ) यांच्या कल्याणासाठी अनेक योजना आखल्या आणि राबवल्या . ही माहिती त्यांना दिली जावी . आगामी काळात कांग्रेस पक्ष त्यांच्या कल्याणासाठी अनेक उपाय योजना आखणार आहे .

त्या योजना राबवल्या जातील . त्यामुळे या घटकाचा विकास होईल ,कल्याण होईल . त्या वंचित समूहाला  कांग्रेस पक्षाने वेळोवेळी मदतीचा हात पुढे केलेला आहे  . त्यांच्या निवासस्थनी जाऊन त्यांना मदत करणे ,त्यांच्या बरोबर मैत्रीपूर्ण व्यवहार करणे यावर कांग्रेस पक्षाने भर द्यायला पाहिजे असे सोनिया गांधी यांनी पक्ष सदस्यांना सुचवले आहे .    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने ज्या योजना राबवल्या आहेत . त्यात अनेक उणीवा आहेत . शिवाय अनेक सामान्य कुटुंबाचे व्यवसाय उध्वस्त झाले आहेत . मोदी सरकारच्या निर्णयामुळे अनेकांना रोजगार सोडावा लागला आहे . त्यांच्या रोजी- रोटीच्या प्रश्नाला कांग्रेस पक्ष वाचा फोडेल . कांग्रेस सदस्यांनी नव्या होऊ इच्छिणाऱ्या सदस्यना या बाबत आश्वासन देऊन त्यांना धीर द्यावा . त्यांचा आपल्यावर पर्यायाने कांग्रेसवर विश्वास वाढत जाईल असे कृत्य अनुभवी कांग्रेस सदस्य आणि पदाधिकाऱयांनी करावे अशा सूचना या प्रसंगी  देण्यात आल्या आहेत .    

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशाची अर्थव्यवस्था चिंताजनक स्थितीत आहे . यातून बाहेर कसे यायचे याचा आराखडा मोदी सरकारकडे नाही . केंद्र सरकारची अर्थव्यवस्थेच्या बाबतीत दिशाहीन वाटचाल सुरु आहे . याचाच परिणाम म्हणून महागाई वाढली आहे .

सामान्य लोकांना दैनंदिन व्यवहारासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू महागल्या आहेत . या विरोधात आपण आवाज उठवला पाहिजे . यामुळे आगामी १४ नोव्हेंबर ते २९ नोव्हेंबर या काळात कांग्रेस पक्ष जण जागरण अभियान राबवेल  . यामध्ये अनुभवी कांग्रेस नेते आणि युवक मोठ्या संख्येने भाग घेतील यावर सहमती झालेली आहे . मोदी सरकार मध्ये न्याय आणि समानता /समता या मूल्यावर हल्ला केला जात आहे . हे हल्ले नियमितपणे वाढत जात आहेत . या विरुद्ध आवाज उठवण्याचा निर्णय कांग्रेसने घेतला आहे .    

मोदी यांच्या कार्यकाळात केवळ ठराविक उद्योगपतींना आर्थिक लाभ होत आहे हे समोर आले . देशातील सूक्ष्म ,लघु ,मध्यम उद्योगाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे . मोदी यांच्या आर्थिक धोरणा विरुद्ध कांग्रेस पक्षाने देश पातळीवर आवाज उठवला पाहिजे . यावर सहमती झाल्याने पक्ष पुढील कार्यक्रम राबवेल असे सुरजेवाला म्हणाले . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment