पुणे – राज्यपाल भगतसिंह कोश्यारीनि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या व्यक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी घेणार..! राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आज पुणे दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच राष्ट्रवादी काँग्रेस त्याना राजभवणावर गनिमी काव्या पध्दतीत काळे झेंडे दाखून निषेध नोंदवणार आहे. अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.
राज्यपाल भगतसिंह कोशयारी यांनी एका कार्यक्रमात बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या एकेरी उल्लंखे करताच राज्यभरात संतापाची लाट पसरवली होती. राज्यपाल हाटाव अशे सगळेच विरोधात म्हणत असताना आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप राजभवणार काळे झेंडे दाखवणार आहे. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी प्रशांत जगताप यांना नोटीसही पाठवली व त्यांना ताब्यात घेण्यासाठी घरी गेले असता प्रशांत जगताप अज्ञात स्थळी पसार झाले आहेत. आता अकरा वाजता पुणे राजभवन येथे राज्यपाला भगतसिंह कोसरी यांचा आगमन होणार असून गनिमी कावा पद्धतीत त्यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात येणार आहे.