राजकारण

राज्यपाल भगतसिंग कोशियारी हे शरद पवार यांच्यावर तीव्र नाराज

  • भाजप फुटण्याची भीती म्हणून राज्यपाल नियुक्त आमदाराचा प्रश्न प्रलंबित `
  • ` शरद पवार यांनी तक्रार करण्याऐवजी परवानगी आणावी `

नवी दिल्ली ता १६ —

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे माझी तक्रार करत असतात . त्यांनी माझी तक्रार केली आहे . मग शरद पवार हे  राज्यपाल नियुक्त आमदारांच्या पत्रावर मी स्वाक्षरी करावी याची परवानगी घेऊन का येत नाहीत . त्यांनी संबधित परवानगी घेऊन यावे . मग मी त्यावर सही करेन असे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी कांग्रेसच्या एका जबाबदार नेत्याला खासगीत बोलताना म्हटल्याचे कळले .    

शिवसेना – राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि कांग्रेस या तीन पक्षाने मिळून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार बनवले . हे सरकार कामकाज करायला लागल्यावर राज्यपाल नियुक्त १२ आमदाराच्या जागा रिक्त झाल्या . त्या जागा भरल्या जाव्यात म्हणून राज्य सरकारने राज्यपालांकडे नावाची शिफारस करण्यास विलंब केला . आता सरकारने नावाची शिफारस केली आहे .

त्यावर राज्यपाल स्वाक्षरी करण्यास तयार नाहीत . हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झालेले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नियुक्ती लवकर करावी म्हणून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची ५ वेळा भेट घेतली . पण या भेटीतून काही निष्पन्न झाले नाही  . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांच्या सह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि राज्यपाल नियुक्त आमदारांच्या मुद्यावर चर्चा केली  . तरीही  या नियुक्त्यांना वेळ लागत आहे . राज्यपाल भगतसिंग कोशियारी लवकर या नियुक्त्या करणार नाहीत असे एका कांग्रेस नेत्याने सांगितले .    

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप बाहेरील लोकांना अनेक आश्वासन देऊन भाजपमध्ये घेतले . अनेकांना राज्यपाल नियुक्त आमदार करतो असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले  . आम्ही ३ पक्षाचे सरकार लवकर पाडू तुम्ही राज्यपाल नियुक्त आमदारांचा मुद्दा निकाली काढू नका असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना दिला  .

हा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या सल्ल्याने देण्यात आला आहे . राज्यपाल हे मूळचे भाजपचे असल्याने या नियुक्त्या रखडल्या आहेत . या नियुक्त्या झाल्या तर भारतीय जनता पक्षात फूट पडणार आहे . ती फूट टाळण्यासाठी भाजप राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न मार्गी लावू देत नाही . ज्या पक्षाचे सरकार असते त्या पक्षाचे सदस्य अथवा जवळचे लोक राज्यपाल नियुक्त आमदार होत असतात .  

 राज्यात ३ पक्षाचे सरकार आहे . यामुळे १२ जागाचे वाटप प्रत्येकी ४-४ असे करण्यात आले आहे . मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकंदर १२ नावाची शिफारस राज्यपालांकडे केली आहे . मात्र राज्यपाल त्यावर स्वाक्षरी करत नाहीत . राज्यपाल सध्या शरद पवार यांच्यावर तीव्र नाराज असल्याचे समजले . राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांना राज्यपाल नियुक्त आमदार या प्रश्नाचे उत्तर देणे अवघड झाले आहे . कांग्रेसचे नेते शरद रणपिसे यांनी एका कार्यक्रमात राज्यपाल नियुक्ती बाबत राज्यपालांना प्रश्न विचारला होता .    

राज्यपाल दिल्लीत येतात . ते नवीन महाराष्ट्र सदनात मुक्कमी असतात . नवीन महाराष्ट्र सदनात राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांना वेगवेळ्या खोल्या (सूट ) राहण्यासाठी आहेत .

राज्यपालाच्या खोलीला कांही दिवसापूर्वी आग लागली होती . त्यामुळे तेथे दुरुस्ती  विषयक कामकाज चालू आहे . याच दरम्यान राज्यपाल दिल्ली भेटीवर आले असता त्यांनी  मुख्यमंत्र्यासाठी  राखीव असलेल्या खोलीत  मुक्काम केला  होता  . राज्यपाल दिल्ली मुक्कामी अनेक सामान्य माणसाला भेटत असतात .

त्यांना कांही जणांनी राज्यपाल नियुक्त आमदाराविषयी विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले नव्हते . दिल्ली मुक्कमी राज्यपाल राजकीय विषयावर बोलत नाहीत . मात्र उत्तराखंड राज्यातील भाजप पदाधिकारी त्यांना भेटण्यासाठी मोठ्या संख्यने नवीन महाराष्ट्र सदनात येत असतात . ते उत्तराखंड विधानसभा निवडणूक या विषयावर खासगीत चर्चा करतात . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment