पश्चिम महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या आरोपात तथ्य नाही – अजित पवार

बारामती- 1999 पासून समाजात जातीय तेढ वाढलाय असे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केले आहे. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे…

पवार म्हणाले की, राज ठाकरे यांनी केलेले आरोप हे धादांत खोटे असून बिन बुडाचे आहेत.. त्याला काही अर्थ नाही. तुम्हाला माहिती आहे पवार साहेबांचे नाव घेतले की, ती बातमी होते. त्यामुळे अशा पद्धतीने राज ठाकरे यांच्यासारख्या व्यक्तीने अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्य वाटत नाही.. असे म्हणत पवार म्हणाले की, राज ठाकरे हे जेव्हा पवार साहेबांची मुलाखत घेत होते तेव्हा ते पवार साहेबांविषयी काय बोलत होते आणि आता काय म्हणत आहेत. इतकं दुटप्पी पणे माणसाने वागू नये.. पवार साहेबांना उभा महाराष्ट्र गेली 55 वर्षंपासून ओळखत आहे.. पवार साहेबांनी नेहमीच शाहू फुले आंबेडकरांचा विचार डोळ्यासमोर ठेवला.. तसेच सर्व जाती-धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं.. वास्तविक पाहता राज ठाकरे यांनी असा आरोप करणे.. हास्यास्पद बाब असून त्यात तसूभर तथ्य नाही नख भर ही तथ्य नसल्याचे पवार म्हणाले…

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment