मूबंई प्रतिनिधी: आज राष्ट्रीय समाज पक्षाचा 18 वा वर्धापन दिनानिमित्त विद्यासागर कार्यालयात दादर कॅडलरोड मूबंई येथे संपन्न झाला.
त्यावेळी महाराष्ट्रातील जिल्हा व तालूक्यातील पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी बहूसंस्येने उपस्थित होते.
मा.महादेवजी जानकर यांच्या संघटनेच्या वाढदिवसाचं औचित्य साधून मान्यवर रत्नाकर गुट्टे साहेब आमदार , बाळासाहेब दोडतोले साहेब महासचिव , बबनराव वीरकर , अण्णासाहेब रुपनवर , नीतीन धायगुडे , माऊली सलगर , भानुप्रियाताई पेद्दी पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष , सविता पाटील , सुवर्णाताई जर्राड सविताताई जोशी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष यांनी पक्षाची भूमिका, वाटचाल,आणी पक्षाची भविष्यातील वाटचाल ह्यावरती मोलाचं मार्गदर्शन केले आणि सगळ्या पदाधिकारीकार्यात खर्या अर्यानै चैतन्य निर्माण होईल अशी आशा व्यक्त केली.

आज पक्षाचे वर्धापन दिनानिमित्त वेगवेगळ्या राज्यांमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. स्वता माननीय महादेवजी जानकर साहेब हे गोवा राज्यात महत्वाच्या सभेला उपस्थित होते
कार्यक्रमाचे सांगता राष्ट्रगीताने झाली
फारच सुरेख थोडक्यात पण सविस्तर बातमी वाचण्यासाठी मिळाली धन्यवाद