देश-विदेश महाराष्ट्र

राहुल गांधी – नाना पटोले भेट, एच के पाटील यांच्या जागी लवकरच नवा प्रभारी नियुक्त होण्याची अपेक्षा

सोनिया गांधी आणि राहुल गांधी लवकरच मुबई भेटीवर 

नवी दिल्ली ता १५ —  

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आज कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली . काँग्रेस पक्षाने अलीकडेच प्रदेश पातळीवरील पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर केली . त्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण ,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि सरचिटणीस मुकुल वासनिक यांचे वर्चस्व आहे . यावर नाना पटोले यांनी आज राहुल गांधी यांच्याकडे नाराजी व्यक्त केली असे समजले .    

कर्नाटकातील नेते एच के पाटील हे महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे प्रभारी  आहेत . यांचे मन वळवून महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसची यादी जाहीर करण्यात आली . ही यादी जाहीर करताना प्रदेश अध्यक्ष नाना पाटोले यांना विश्वासात घेतले नाही . यामुळे नाना पटोले प्रचंड नाराज होते . आपली नाराजी प्रकट करण्यासाठी त्यांनी आज गांधी यांची भेट घेऊन राज्यातील राजकारणावर चर्चा केली . आता आगामी काळात एच के पाटील यांच्या जागी नवा पक्ष प्रभारी असेल असे कांग्रेस सूत्राने सांगितले .

नवा कांग्रेस प्रभारी हा केरळ किंवा तामिळनाडू राज्यातील असेल असे कळते .   अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटनीस  तारिक अन्वर यांना महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचे प्रभारी केले जावे अशी मागणी कांग्रेसचा एक समूह करत होता . ही मागणी असली तरी केरळ किंवा तमिळनाडूतील एखादा नेता महाराष्ट्र प्रदेश कांग्रेसचा प्रभारी होईल असे कांग्रेसच्या सूत्राने सांगितले . ही घोषणा लवकरच होणार असल्याचे समजले . तारिक अन्वर हे बिहारचे असून ते राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात जाऊन आता परत कांग्रेस मध्ये आले आहेत .    

महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कार्यकारिणीत अनेक लोक अनेकांच्या ओळखीचे नाहीत . सामान्य सदस्याला उपाध्यक्ष अथवा सरचिटणीस अशी पद देण्यात आली . यावरून प्रदेश पातळीवर मोठा वाद निर्माण झाला आहे . नाना पटोले यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन नाराजी व्यक्त केली तरी जाहीर करण्यात आलेल्या यादीवर लवकरच कात्री लावली जाणार नाही असे कांग्रेस पदाधिकाऱ्याने स्पष्ट केले .    

राज्यात मुंबई महानगर पालिकेची निवडणूक पुढील वर्षी होणार आहे . हे पाहता राज्यात खास करून मुंबईत कांग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचा दौरा व्हावा असे नियोजन केले जात आहे . हा दौरा मुंबई महानगर पालिका निवडणूक डोळ्यापुढे ठेऊन आखला  जाणार आहे . मुंबई प्रदेश काँग्रेसने  नियोजित कार्यक्रमाची तयारी आधीपासूनच सुरु केली असल्याचे कळले . 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment