देश-विदेश

राहुल गांधी यांच्या अनुपस्थिती कन्हैया कुमार आणि जिग्नेश मेवाणी यांचा कांग्रेसमध्ये प्रवेश

कमलेश गायकवाड नवी दिल्ली ता २८ —

कांग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत कन्हैया कुमार आणि जिग्नेस मेवाणी यांचा कांग्रेस पक्षात प्रवेश होणार होता . त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला पण राहुल गांधी या प्रसंगी हजर नव्हते .    

२४ अकबर रोड या कांग्रेस मुख्यालयात दोघांनी कांग्रेसमध्ये प्रवेश केला .  कांग्रेसचे निवडणूक चिन्ह असलेला पंजा  हा  तिरंगी रंगाच्या  मफलरवर असतो . ते मफलर  गळ्याभोवती टाकून कांग्रेस प्रवेश झाल्याचे अधिकृत रित्या जाहीर केले जाते . एकच मफलर गळ्याभोवती टाकले जाते .

मात्र या प्रसंगी तिघांनी ३ मफलर कुमार आणि मेवाणी यांच्या गळ्याभोवती टाकले . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात बोलण्यात हे दोघे पटाईत आहेत .यामुळे त्यांना कांग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात सम्मान देण्यात आला . आज काँग्रेस मुख्यालयात कांग्रेस सदस्यांच्या तोंडावर स्फूर्ती ओसंडून वहिली .  

 

डावीकडून हार्दिक पटेल ,जिग्नेश मेवाणी ,राहुल गांधी आणि कन्हैया कुमार  हुतात्मा भगतसिंग शहिद उद्यान स्थळी 

याप्रसंगी कांग्रेसचे संघटन सरचिटणीस के सी वेणुगोपाल ,संवाद विभागाचे प्रमुख रणदिपसिंह सुरजेवाला , गुजरात प्रदेश कांग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल , महाराष्ट्रातून ऊर्जामंत्री नितीन राऊत आदी हजर होते . आज हुतात्मा भगतसिंग यांची जयंती आहे .

हे औचित्य साधून त्यांनी कांग्रेस पक्षात प्रवेश केला . या आधी कुमार यांनी  राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भगतसिंग यांचे संयुक्त फोटो असलेले एक फोटो फ्रेम भेट म्हणून दिली .   नितीन राऊत ,मुंबई प्रदेश अध्यक्ष भाईजगताप ,महाराष्ट्राचे माजी कांग्रेस प्रभारी आणि राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी जिग्नेश मेवाणी यांनी कांग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी प्रयत्न केले असे समजले . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment