विदर्भ

वनपरिक्षेत्र कार्यालय वन्य प्राण्यांच्या चित्रांनी सजले

अमरावती – चांदुर रेल्वे तालुक्यातील वन प्रादेशिक कार्यालयाने कार्यालयाच्या परिसरात वन्य पशु चित्र काढून त्या भागातील भीती बोलक्या केल्या आहेत. येता जातांना लोकांना असं वाटतं की हे कार्य शासकीय कार्यालय की अन्य काही असा प्रश्न पडणे इतपत या इमारतीने आपली कात टाकली आहे.
चांदुर रेल्वे शहरातील मध्यवस्तीत असलेले वन विभाग कार्यालय येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष भिंतीकडे पाहून वेधून घेत आहे. सदर भिंतीवर चित्ते, पट्टेदार वाघ, बिबट्या, रोही, काळवीट, हरीण, साळींदर, खवले मांजर, अजगर, शेकरू, इत्यादी प्रकारचे पशु, प्राणी भिंतीवर साकारून कार्यालयाने वनसंपत्तीच्या चित्रांनी कार्यालयाला आकर्षक व सुंदर बनविले आहे.
मागील वर्षी रुजू झालेले वनपरिक्षेत्र अधिकारी आर बी पवार यांच्या स्वतःच्या संकल्पनेतून हे चित्र साकारले आहे.
सदर वनपरिक्षेत्र कार्यालय हे मेन रोड टच असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांची किंवा गावातील नागरिकांची या चित्राकडे पाहून डोळे दिपून टाकणारे चित्र वन विभाग कार्यालयाने उभे केले आहे.
भिंती बोलक्या करीत असताना हुबेहूब दिसणारे पट्टेदार वाघ, बिबट तसेच चिरोडी पोहरा जंगलातील व मेळघाटातील निसर्गाच्या छटा उमटल्या हे चित्र पोहरा चिरोडी जंगल म्हणजे अमरावती शहराचे वैभव वर्षातील आठ महिने हे जंगल निसर्ग सौंदर्याची उधळण करत असते. या जंगलाची अशी अनेक वैशिष्ट्ये या कलाकृतीतून वनपरिक्षेत्राच्या कार्यालयाच्या भिंतीवर काढण्यात आली आहे या चित्रांनी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा कायापालट झाला आहे.
राज्य शासनाने नवीन वनपरिक्षेत्राची निर्मिती करताना वडाळी वनपरिक्षेत्राचे विभाजन करून चांदुर रेल्वे या नवीन वन परीक्षेत्राची निर्मिती झाली. त्या कालावधीत चांदुर रेल्वे वनपरिक्षेत्र कार्यालय उभारण्यात आले होते आता विविध प्राण्याच्या चित्रांनी या कार्यालयाला नवे रूप प्राप्त झाले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment