कोंकण

व्हेल माशाच्या उलटीची तस्करी; दापोली आणि पुण्यातील आरोपींच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

रत्नागिरी – पुण्यातील डेक्कन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५ जण तब्बल ५ कोटीपेक्षा  जास्त रकमेत व्हेल माशाच्या उलटीची तस्करी करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.

राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, आंजर्ले ता.दापोली), नवाज अब्दुला कुरुपकर, वय २४, अजिम महमुद काजी, वय ५० (दोघेही अडखळ जुईकर मोहल्ला),  विजय विठ्ठल ठाणगे, वय-५६,अक्षय विजय ठाणगे, वय- २६ रा दोघेहि रा.पुणे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.आरोपी राजेंद्र राकेश कोरडे यांच्या ताब्यात असेलेल्या काळया रंगाच्या बॅगेमध्ये व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा त्याचे वजन २ किलो ९९४ ग्रॅम इतके कि २,९९,४०,०००/- इतकी आहे. तर दुसरा आरोपी नवाज अब्दुला कुरुपकर याच्या ताब्यात असलेल्या मेहंदी रंगाच्या बॅगेमध्ये आढळलेल्या व्हेल माशाच्या उलटीच्या तुकड्याचे वजन २ किलो २८६ ग्रॅम इतके आणि त्याची किंमत २,२८,६०,००० एवढी आहे. तसेच तिसरा आरोपी विजय विठ्ठल ठाणगे याच्या कडील ताब्यात असलेली एक काळया रंगाची हिरोहोंडा स्पेल्डर एन एक्स जी स्मार्ट दुचाकी क्रमांक एम.एच १२ एम. के- ९१९३ अशा वर्णनाची किंमत ३५,००० असा एकूण 5 किलो व्हेल माशाचा उल्टीचे तुकडे आणि एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. त्याच्याकडून ५.२८,३५,००० एवढ्या किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलिस ठाण्यात राकेश कोरडे, नवाज कुरुपकर, अजीम काजी, विजय ठाणगे, अक्षय ठाणगे (पुणे) या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांना अटक केली आहे. त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९, ४४, ४९ (ब), ५१, ५७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी पाडोळे करत

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment