देश-विदेश राजकारण

शरद जोशी यांच्या स्वतंत्र भारत पक्षाचे पुनरुज्जीवन

आम्ही दिल्लीत शेतकरी आंदोलन करू — अनिल घनवट

कमलेश गायकवाड
नवी दिल्ली ता २४ — समितीने १९ मार्च २०२१ रोजी 3 कृषी कायद्याच्या संदर्भात एक अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे सुपूर्द केला . तो अहवाल सार्वजनिक केला जावा अशी मागणी अनिल घनवट यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या समितीचे घनवट सदस्य होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने कृषीत सुधारणा करण्यासाठी 3 कायदे केले होते . या कायद्याला संयुक्त शेतकरी मोर्चाने विरोध केला . हा विरोध सलग एक वर्ष चालला . अखेर सरकारने ते कायदे रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यावर आता पुढे अंमलबजावणी केली जात आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात ( २९ नोव्हेंबर २०२१ ते २३ डिसेंबर २०२१ कालावधीत) कायदे रद्द करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाण्याचे आश्वासन मोदी यांनी दिले आहे.


 या आधी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते . सरकार आणि संयुक्त शेतकरी मोर्चा यांच्यात किमान १२ वेळा चर्चा झाली . शेतकरी आंदोलन एक वर्षा पासून सुरू आहे. दिल्लीच्या 3 सिमेवर अद्याप आंदोलन सुरू आहे. संसदेत कायदा रद्द व्हावा आणि किमान आधारभूत भाव मिळावा म्हणून कायदा केला जावा अशी संयुक्त शेतकरी मोर्चाची मागणी आहे.

सरकारने काही काळासाठी कायदे लागू करणार नाही म्हणून त्यावर अंमलबजावणी केली नाही. देशभरातील मत जाणून घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने एक समिती स्थापन केली. त्या समितीत अनिल घनवट यांचा समावेश होता. त्या समितीने  अनेक शेतकरी संघटना आणि संबंधित लोकांबरोबर चर्चा करून एक अहवाल सर्वोच्च न्यायालयाकडे दिला. तो अहवाल सार्वजनिक झाला नाही . तो अहवाल सार्वजनिक केला जावा अशी मागणी घनवट यांनी केली.


समितीचा  अहवाल सार्वजनिक करायचा नसेल तर मग समिती का नियुक्त केली असा प्रश्न घनवट यांचा असल्याचे समजते. संबंधित समितीला आपला अवमान झाल्यासारखे वाटत आहे असे कळले.


केंद्र सरकार किमान 23 शेती उत्पादनाला किमान हमी भाव देते . हे शेती उत्पादने सरकार आणि खासगी कंपन्या देखील खरेदी करतात. आता  किमान हमी भावाचा कायदा करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत.

अनिल घनवट हे राज्यसभेचे माजी दिवंगत खासदार शरद जोशी शेतकरी संघटनेचे सदस्य आहेत. शरद जोशी यांचा स्वतंत्र भारत पक्ष होता . या पक्षाचे पुनरुज्जीवन करण्याचा मानस घनवट यांचा आहे.  आगामी दोन महिन्यांत कृषी कायद्याचे समर्थन करणारे शेतकरी दिल्लीत घेऊन आंदोलन करणार असल्याचे अनिल घनवट यांनी दिल्लीत म्हटले.


   दिल्लीतील आंदोलना मार्फत घनवट स्वतंत्र भारत पक्ष पुनर्जीवित करणार आहेत असे कळले. माजी दिवंगत पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी पदावर असताना शरद जोशी राज्यसभेचे खासदार होते. प्रमोद महाजन यांच्या प्रयत्नातून शरद जोशी खासदार झाले होते . त्याच्या पक्षाचे निवडणूक चिन्ह विमान होते. 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment