देश-विदेश

श्रीनगर – शारजा विमानसेवेत पाकिस्तानकडून विघ्न

पाकिस्तानची विमानसेवा थांबवण्यावर भारताचे मौन

कमलेश गायकवाड
नवी दिल्ली ता २६ — श्रीनगरहून ( भारत) , शारजा ( संयुक्त अरब अमिरात) या आंतरराष्ट्रीय विमानसेवेत विघ्न घालण्यास पाकिस्तानने सुरुवात केली आहे.या बाबत भारताने पाकिस्तानकडे परवानगी मागितली आहे .मात्र या क्षणी या विषयी सविस्तर माहिती माझ्याकडे नाही असे एका प्रश्नाच्या उत्तरादाखल परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले.


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडेच श्रीनगर – शारजा या आंतरराष्ट्रीय विमानसेवेचा शुभारंभ केला होता. ही विमानसेवा पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून जाते.पाकिस्तानने किमान ३ ते ४ वेळा आपल्या हवाई हद्दीतून  भारताचे विमान जाऊ देण्यास विरोध केला .

यानंतर भारताने विमानसेवा सुरळीत चालू देण्यास अनुमती द्यावी अशी मागणी केलेली आहे. पाकिस्तानने काय प्रतिसाद दिला याविषयी माझ्याकडे सविस्तर माहिती नाही असे बागची म्हणाले.


ही विमानसेवा गुजरातहुन ओमान मग शारजाला जावी यावर देखील विचार केला जात आहे . मात्र या बाबत अधिक  माहिती नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पाकिस्तानचे विमान  भारताच्या हवाई हद्दीतून कवलालांपूर आणि सिंगापूरला जातात .या विमानसेवेला  भारत स्वतःच्या हवाई हद्दीतून जाऊ देण्यास  बंद करेल का असा प्रश्न विचारल्यावर  या बाबत देखील अरिंदम बागची यांनी माहिती दिली नाही. 

ReplyForward

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment