ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत.
ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर सेल यांने केला आहे. केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे.
प्रभाकर सेलने म्हटलंय की तो गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असं त्याने सांगितलं. दरम्यान, क्रूझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल माहिती नसल्याचाही दावा त्याने केलाय. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिल्याचंही म्हटलंय.
क्रूझवर छापेमारीच्या वेळी आपण काही व्हिडिओ आणि फोटो काढले होते, असंही प्रभाकरने सांगितलं. त्यापैकीच एका व्हिडिओमध्ये गोसावी आर्यन खानला फोनवर कोणाशी तरी बोलायला लावताना दिसत आहे. दरम्यान, प्रभाकर सेलने केलेल्या आरोपांनंतर या छापेमारी संदर्भात आणि एनसीबी अधिकाऱ्यांसह केपी गोसावीच्या भूमिकेबाबतीत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
“ मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न ” ; समीर वानखेडेंचं पोलीस आयुक्तांना पत्र!
सध्या राज्यात मुंबईतील ड्रग्ज पार्टी प्रकरण व आर्यन खान वरून राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत आहे. सत्ताधारी व विरोधकांमध्ये यावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. यामध्ये एकीकडे आर्यन खान तर दुसरीकडे एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे केंद्रस्थानी आहेत. दररोज नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज समोर आलेल्या एका व्हिडिओन खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांने केला आहे. तर, “ मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न” होत असल्याचं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
समीर वानखेडे यांनी पोलीस आयुक्तांना या संदर्भात पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे की, “मला ड्रग्ज प्रकरणात चुकीच्या पद्धतीने अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. माझ्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाऊ नये, हे प्रकरण माझ्या वरीष्ठाकडे आहे. मला तुरुंगात टाकण्याच्या आणि नोकरीमधून काढून टाकण्याच्या धमक्या काही लोकांकडून देण्यात आल्या. हे प्रकरण डीडीजी यांनी एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवलं आहे, त्यामुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जाऊ नये.”
केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे.
केपी गोसावीच्या सहकाऱ्याने केलेल्या आरोपांवर समीर वानखेडेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
केपी गोसावीच्या सहकाऱ्याने केलेल्या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदारांपैकी एक फरार केपी गोसावीच्या सहकाऱ्याने एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने त्यांना खोट्या पंचनाम्यावर सही करायला लावली होती, असा आरोप केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांने केला आहे. केपी गोसावी हा क्रूझवरील छापेमारी प्रकरणातील ९ साक्षीदारांपैकी एक आहे. केपी गोसावीचा आर्यन खानसोबत सेल्फी व्हायरल झाल्यानंतर तो बेपत्ता झाला होता. त्याने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्याकडून आपल्या जीवाला धोका असल्याचा दावा केला इंडिया टूडेशी बोलताना केला आहे. त्याच्या या आरोपांना समीर वानखेडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
केपी गोसावीचा सहकारी प्रभाकर साईल यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय संचालक समीर वानखेडे म्हणाले, “मी प्रभाकर साईल यांच्या आरोपांना योग्य उत्तर देईल.” वेळ आल्यानंतर प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांना योग्य वेळ आल्यानंतर प्रत्युत्तर देईल, असं समीर वानखेडे यांनी म्हटलंय.
प्रभाकर साईल यांनी काय म्हटलंय?
प्रभाकर सेलने म्हटलंय की तो गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. ज्या रात्री क्रूझवर छापेमारी करण्यात आली त्या रात्री तो गोसावी सोबत होता. त्या छापेमारीनंतर पंचनामा म्हणून एनसीबीने कोऱ्या कागदावर सह्या करायला लावल्या, असं त्याने सांगितलं. दरम्यान, क्रूझवर झालेल्या जप्तीच्या कारवाईबद्दल माहिती नसल्याचाही दावा त्याने केलाय. त्याने सॅम आणि गोसावी नावाच्या व्यक्तीला एनसीबी कार्यालयाजवळ भेटताना पाहिल्याचंही म्हटलंय.