अग्रलेख विचार

साफ नियत सही विकास?

जरा काळच वेगळा आला. समजा तुम्हाला मुलं झाली नाहीत तर फक्त एकदा जाहिरात कंपनी ला भेट द्या. तात्काळ जाहिराती करून तुम्हाला मुलं झाल्याचे साऱ्या जगाला पटवून देतील. ते पण टेचात. आजकाल हि गोष्ट तंतोतंत लागू होते सरकारी जाहिराती मधून.
१. युरिया भरपूर मिळतोय शेतकऱ्यांना – ऐकलंय मोदी विकताय
२. आजोबांना गुढग्यांचे ऑपरेशन करायला मदत झाली – ऐकलंय मोदी करताय
३. शाळेत टॉयलेट आलाय – ऐकलंय मोदी यांनी दिलंय
४. आई आता गॅस वॉर जेवण बनविते – ऐकलंय मोदी विकताय
मागच्या ७० वर्षात जे नाही घडलाय ते ४८ महिन्यात झालंय असा म्हणतात ते.
आणि हे का होतंय तर साफ नियत सही विकास?

आपण जेव्हा स्वतंत्र झालो तेव्हा मुळात देशच नव्हतो. सरदार पटेलांनी आपल्या अंगी असलेल्या स्किल चा वापर करून संपूर्ण देश एकत्र बांधून ठेवला आणि मग आपली देश म्हणून वाटचाल सुरु झाली.

या देशाचा स्वातंत्रानंतरचा इतिहास आपल्याला हे शिकवतोय कि जगाच्या पाठीवर आपले अस्तित्व उमटायला ४० वर्ष लागली. नेहरूंच्या नंतरची वाटचाल हि यात फार महत्वाची आहे. कारण नेहरू यांच्यासमोरील प्रश्न वेगळी होती.

ते त्यावेळी संविधान आणि त्याचा अनुषंगाने होणारे देशातील बदल यात व्यस्त होते. त्यांचे ध्येय होते जगाच्या नकाशावर भारताचे स्थान शास्त्रींनी खरे आपल्या मध्यमवर्गीय समाजाच्या गरजांचा तोल सांभाळून पावला टाकली. देशाला एक दिवसाच्या उपवासाचा नारा त्यांनी घरी प्रथम मुलांना उपाशी ठेवण्याच्या यशस्वी प्रयोगानंतर घोषित केला.

जय किसान चा नारा त्यांनी राजभवनात हातात नगर घेऊन शेती करून दिला. आणि देशांनी कृषी क्षेत्रात हि प्रगती करणारे पाऊल टाकले. भलेही इंदिरा गांधी यांनी आणीबाणी चा काळा दिवस आपल्याला दाखविला म्हणून त्यांची महती कमी होणार नाही.

आयर्न लेडी ने जगाच्या पाठीवर देशाच्या सैन्याचा दबदबा असा केला कि ९०००० हजार सैन्ययाचा सैन्यप्रमुख नियाझी ३००० हजार सैन्याचा फौजेसमोर आत्मसमर्पण करता झाला. सैन्याचा युद्धकसबी तर यात होतीच पण जागतिक राजकारणात आपल्या दबदब्याची हि नांदी होती. पाकिस्तानचा बांगलादेश करून टाकला आणि संपूर्ण सैन्य देशात परत पण घेतला. साधा भारताचा झेंडा पण नाही रोवला आणि जगाला सांगितलं कि आम्ही खरे शांततेचे पाइक आहोत.


ज्या ट्रोल आर्मी च्या भरवश्यावर आजकालचे सर्व राजकारणी सर्व पक्षाचे धुडगूस घालताय त्यांना आठवण असायला हवी ती राजीव गांधी यांच्या डिजिटल क्रांतीची. भारताला जगाच्या पाठीवर स्पर्धेत उभे ठेवावे म्हणून राजीव यांनी डिजिटल भारताचे स्वप्न सत्यात उतरवले. भटकरांनी सुपर कॉम्पुटर बनवला. ( नई त कदाचित आजच्या प्रधानमंत्र्यांना असे इव्हेंट घेता आले नसते).

विश्वनाथ प्रताप सिंग यांनी आणलेली मंडळ ची शिफारस किती वादातीत आहे हा चर्चेचं विषय असेल कदाचित पण त्यांना सामाजिक उपेक्षेची असावी कदाचित.


पी व्ही नरसीमहाराव यांची भारतीय बाजाराची जागतिकारण योजना हि आपल्या देशाच्या विकासाची संजीवनी योजना. देश अर्थसाक्षरतेकडे इथून पाऊल टाकता झाला. जागतिक कीर्तीच्या लोकांना हाती घेऊन त्यांनी आपला भविष्याचा पाया उज्वल केला.


कविराज अटल जी यांच्या राजकारणाची दिशा देशाच्या ग्रामीण भारताला समृद्ध करण्याचा उत्तम प्रयास म्हणून पाहाल जाऊ शकतो. अणुचाचणीच्या एका धमाक्याने जगाच्या चारी दिशा हादरवणारा कवी पंतप्रधान देश हि भावना रुजवून गेला.


मनमोहन सरदारजी आपल्या चालीत, बोलण्यात अगदीच शांत पण देशाची अर्थव्यवस्था बोलकी केली. आधार, जी एस टी अश्या अनेक योजना त्यांनीच या देशाच्या पटलावर प्रथम, मांडल्या.

यातून इतका तर दिसतेच कि नियत सगळ्यांची ठीकच होती आणि विकास पण साफच होता.
आता उरला मुद्दा तो आपल्या प्राधानसेवकांचा ? ( प्रधानसेवक हा शब्द नेहरूंनी स्वतःसाठी वापरला होता सर्वात प्रथम) मुळात त्यांचा इतिहासाच्या पटलावर बरेच काही वाद्ग्रस्थ आहे. विकासाची यांची व्याख्या नेमकी कशी समजावी हा प्रश्न आहे ?


भारतभर सध्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा सप्ताह सुरु आहे, गावबंदी,दुधबंदी सगळं सध्या सुरु आहे. ५ लाख गावात वीज पुरवणाऱ्यांवर १८ हजार गावात वीज पुरवणाऱ्यानी जाहिराती मधून विजय प्राप्त केला. गोध्रा हत्याकांडाच्या आरोपाचे डाग असणारे सुटून दाभोलकर पानसरेंचा जीव घेणारे आलेत बाहेर. राजकीय पक्ष्यांच्या देणग्या हजारो पटीने वाढतात म्हणजे काय होत असेल नेमका. नेमका भ्र्रष्टचार होतो. कारण हे देणग्या देणारे काही दान नाही देत ते देतात ती घूस. १००० कोटी वर्गणी एका राजकीय पक्षाला. पाठवा बार गरीब मदत मागायला नाही देणार कुणीच.


तेव्हा या बकवास प्रचाराला बळी पडू नका. मतदान वाटेल त्याला करा तुमाला मोदी आवडत असेल तर पुढील १५ वर्ष त्यांनाच मत द्या पण, ५ वर्ष प्रश्न विचारा.
विचारा त्यांना
* जागतिक बाजारात पेट्रोलियम १४०/बॅरेल असताना आम्ही पेट्रोल ७० रुपये घेत होतो आणि आता पेट्रोलियम ५०/बॅरेल असताना आम्ही पेट्रोल ८६ रुपये का घेत आहोत? विकास करण्याकरिता आमच्या टॅक्स चा वापर करता असे म्हणत असाल तर त्याचवेळी जगातील मोठ्या उद्योगपट्यांचे का कर्ज माफ करता २ लाख कोटीचे.
* ४८ महिन्यात तुम्हाला का मुहूर्त नाही भेटला शेतकऱ्यांचा दुप्पट भावाचा प्रश्न सोडवायला.
* भ्र्रष्टाचाराची काली दुनिया साफ करताना तुम्हालाच का रेड्डी बंधू, येडियुरप्पा यांची गरज भासते.
* आमच्या जिवाची मुंबई न होता तुम्हीच प्रचारात कसे हिंडत बसता.
* आपल्या देशात लोकांना मारले जात असताना तुम्ही का मौन?
* देशातील लेखकांना पत्रकारांना विचारवंतांना मारण्याच्या धमक्या देणाऱ्यांना तुम्ही समाजमाध्यमांवर का फॉलओ करता.

यादी लांब आहे, सांगणे एकच आहे तुम्हाला कि आजच जागे व्हा. आणि संविधानाने बोलण्याचा प्रश्न विचारण्याचा, जगण्याचा दिलेला अधिकार साबूत करा. वोट तुम्ही कुणाला पण करा पण बोलते व्हा आणि या हार्वर्ड ऑक्सफर्ड विद्यापीठातून आलेल्या प्रपोगंडा पंडितांच्या जाळ्यात पडू नका कारण?
कारण हिटलर हा स्वतः काहीच नसतो त्याला क्रूर बनवते ते त्याच्या चाहत्यांचा अंध समर्थन.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment