वारंवार प्रयत्न करुनही विद्यमान सत्ताधारी सरकारला जवाहरलाल नेहरू (जेएनयू) विद्यापीठाची प्रतिष्ठा कमी करण्यामध्ये अद्यापी यश आलेलं नाही. “‘राष्ट्रद्रोही विद्यार्थी’ आणि ‘नैतिकदृष्ट्या बेजबाबदार’ असे डाव्या विचारसारणीचे शिक्षक यांची गर्दी असलेला ‘अस्वस्थ’ कॅम्पस” अशा रीतीने सध्या ‘जेएनयू’चे चित्र रंगविले जात आहे. असे असले तरीही, हे विद्यापीठ ही एक अशी जागा आहे जिथे विचार वृद्धिंगत होतात, पुस्तकांवर आवडीने चर्चा केली जाते, सातत्याने वादविवाद होतात आणि नियमित वर्गही भरवले जातात. इथे मार्क्सचीही चिकित्सा केली जाते, त्याच्या सिद्धान्ताना प्रश्न विचारले जातात आणि आंबेडकरांकडेही बिनचूक म्हणून बघितले जात नाही. यामुळेच अध्ययन आणि संशोधन एकमेकांना पूरक ठरतात.
यामुळे स्वतःला देशभक्त म्हणवणाऱ्या टीव्ही चॅनेल्सच्या नकारात्मक प्रचारानंतरही देशभरातले तरुण विद्यार्थी ‘जेएनयू’मध्ये येण्यासाठी उत्सुक असतात. एक संशोधक म्हणून, तज्ञ म्हणून आपली जडणघडण व्हावी आणि जबाबदार नागरिक म्हणून आपला विकास व्हावा, यासाठी त्यांना आजही जेएनय़ू हाच योग्य पर्याय वाटतो.
यावर्षीही हे विद्यार्थी मे महिन्यात ‘जेएनयू’ विद्यापीठाच्या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करतील व त्यामध्ये यशस्वी होण्यासाठी मनापासून पूर्वतयारीही करतील. मात्र त्यांच्या यशासाठी त्यांना शुभेच्छा देत असतानाच मला त्यांच्याबद्दल वाईटही वाटत आहे. माझे असे बोलणे विचित्र वाटू शकते याची मला जाणीव आहे, म्हणूनच मी असे का म्हणत आहे, यामागचे कारण मी स्पष्ट करत आहे.
कल्पनाशक्ती मारणे : एमसीक्यू (MCQ) पद्धतीची विवेकशून्यता
जेएनयू ही चिकित्सक विचारांना प्रोत्साहन देणारी, विविध कल्पनांशी झुंजायला लावणारी आणि जगाची संकल्पानात्मक मांडणी करण्यासाठी आवश्यक असलेली योग्य भाषा विकसित करणारी, त्या भाषेवर प्रभुत्व मिळवून देणारे ज्ञानगृह आहे, याची मला एक शिक्षक म्हणून खात्री आहे. दुसर्या शब्दांत, जेएनयू आणि अर्थात त्याची उमदारमतवादी परंपरा म्हणजेच अर्थान्वयवादी आकलन, चिकित्सात्मक दृष्टी आणि सर्जनशील मांडणी होय. म्हणूनच इथे जेव्हा एखादा विद्यार्थी कार्ल मार्क्ससारख्या विचारवंताचा अभ्यास करतो, तेव्हा त्याला/तिला मार्क्सचे मूळ लिखाण वाचावे लागते, त्यावर चर्चा करावी लागते, वादविवादात उतरावे लागते आणि ‘वस्तूलोभस्तोम’ (कमोडिटी फेटीशिझम) यासारख्या विषयावर वादविवाद आणि चर्चा करून एक प्रबंध लिहावा लागतो.
यामुळेच आजपर्यंत जेएनयूची प्रवेश परीक्षा ही गुणात्मकरित्या वेगळ्या प्रकारची चाचणी परीक्षा म्हणून प्रसिद्ध होती. खास करून समाज विज्ञान शाखांच्या बाबतीत, विचार करण्यास प्रवृत्त करणारे, चिंतनशील आणि निबंधाच्या स्वरुपात विचारांची सुसंगत मांडणी करायला लावणारे प्रश्न उपस्थित केले जायचे.
समाजशास्त्र विषयाच्या (बहुधा २०१६च्या) एम.ए.च्या प्रवेश परीक्षेमध्ये विचारलेला एक प्रश्न मला आठवतो. रविंद्रनाथ टागोरांच्या राष्ट्रवाद या संकल्पनेचे विवेचन करणाऱ्या निबंधातील उतार्याने त्याची सुरुवात झाली; आणि त्यांनंतर विद्यार्थ्यांना टागोरांच्या समकाळात राष्ट्रवाद या संकल्पनेभोवती जे राजकारण सुरु होतं त्याचा संदर्भ देत टागोरांचे विचार स्पष्ट करण्यास संगितले गेले. हा काही सर्वसाधारण पुस्तकी प्रश्न नव्हता. तर विद्यार्थ्याची सर्जनशीलता आणि त्यांची चिकित्सक क्षमता जाणून घेण्यासाठी खास तयार केलेला असा हा प्रश्न होता.
त्यामुळेच ‘जेएनयू’च्या प्रवेश परीक्षेची पूर्वतयारी करणे हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळ्या प्रकारचा अनुभव असायचा. साचेबद्ध एनईटी (NET) परीक्षा, किंवा यांत्रिक युपीएससी (UPSC) परीक्षा (ज्याने प्रत्येक बातमी ‘खेळ’,‘परराष्ट्र व्यवहार’ आणि ‘राजकारण’ यासारख्या विविध संभाव्य प्रश्नांमध्ये विभागून विद्यार्थ्यांचा वर्तमानपत्र