Delhi News राजकारण

हिंदू राष्ट्र उभारण्यासाठी शंकराचार्य आणि राज ठाकरे यांच्यात १८ ऑक्टोबर रोजी मुंबईत बैठक

कमलेश गायकवाड 
नवी दिल्ली ता ११ —  

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट शंकराचार्य ,  

“ हिंदू राष्ट्र “ उभारणीसाठी कार्यरत इतर सन्माननीय व्यक्ती घेणार आहेत . ही भेट येत्या १८ तारखेला मुंबईत राज ठाकरे यांच्या निवासस्थानी होणार आहे असे कळले .    शिवसेना – राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष आणि कांग्रेस पक्षाने महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार बनवले . तेंव्हापासून शिवसेनेच्या हिंदुत्वावर भाजप संशय घेत आहे . शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न म्हणून शिवसेना ही आता सोनिया सेना ,बाबर सेना ,चिऊ सेना झालेली आहे असे आरोप विरोधी लोकांनी केले . मात्र शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत शिवसेनेने हिंदुत्व सोडलेले नाही असे वारंवार विधान केलेली आहेत .  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची सूत्र हाती घेतल्यापासून हिंदुत्ववादी विचारधारेतील लोकांना देशाची लवकर   “हिंदू राष्ट्र “म्हणून  घोषणा  केली जावी असे मनापासून वाटत आहे . वेगवेगळ्या संघटना ,संस्था यासाठी कार्य करत आहेत . अशा संस्था ,संघटना यांचे मोजके प्रतिनिधी येत्या १८ तारखेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटणार आहेत . उत्तर प्रदेशातील प्रयागराज आणि दिल्लीतील हिंदुत्वादी संघटना /संस्था यातील अनेक लोक राज ठाकरे यांची भेट घेऊन “ हिंदू राष्ट्र “ उभारणी यावर चर्चा करणार आहेत असे समजले .  

लोकसभा निवडणूक २०१९ मधील निवडणूक प्रचारात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर “ लावरे तो व्हिडीओ “ म्हणून मोठ्या प्रमाणात टीका केली होती . त्यांचे ते भाषण अन्य प्रादेशिक भाषेत देखील सार्वजनिक करण्यात आले होते .महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाचा ध्वज बदलला आहे . त्यांनी नवीन ध्वज स्वीकार केलेला आहे . हा मोठा बदल त्यांच्या पक्षाने केला आहे .    छत्रपती शिवाजी महाराज यांची राजमुद्रा भगव्या ध्वजावर अंकित आहे . हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा नवा ध्वज आहे . आगामी १८ ऑक्टोबरच्या भेटीनंतर राज ठाकरे काय भूमिका घेतील . यांची उत्सुकता त्यांना भेटणाऱ्याच्या मनात आहे . मुंबईला पोचण्याची लगबग सुरु झालेली आहे . 

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment